Lokmat Sakhi >Social Viral > घरात सतत कोळ्यांचे जाळे लागतात ? ४ सोपे उपाय - नेहमी होणारा त्रास होईल बंद...

घरात सतत कोळ्यांचे जाळे लागतात ? ४ सोपे उपाय - नेहमी होणारा त्रास होईल बंद...

How to get rid of spiders: Home remedies to get rid of spiders naturally : जर कोळी वारंवार घराच्या कानाकोपऱ्यात जाळे बनवत असतील तर त्यांना साफ करण्याचा त्रास टाळण्यासाठी सोप्या उपायांची मदत घेऊ शकता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 06:17 PM2023-09-28T18:17:41+5:302023-09-28T18:38:06+5:30

How to get rid of spiders: Home remedies to get rid of spiders naturally : जर कोळी वारंवार घराच्या कानाकोपऱ्यात जाळे बनवत असतील तर त्यांना साफ करण्याचा त्रास टाळण्यासाठी सोप्या उपायांची मदत घेऊ शकता....

How to get rid of spiders and cobwebs from your house, How to Keep Spiders Away | घरात सतत कोळ्यांचे जाळे लागतात ? ४ सोपे उपाय - नेहमी होणारा त्रास होईल बंद...

घरात सतत कोळ्यांचे जाळे लागतात ? ४ सोपे उपाय - नेहमी होणारा त्रास होईल बंद...

घरात झुरळ, पालं, डास, मुंग्या, कोळी यांचा वावर असला की त्यांचा आपल्याला त्रास होतो. घरांतील हे लहान - मोठे किटक घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. घरात थोडी जरी अस्वच्छता झाली किंवा स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याकडून थोडा निष्काळजीपणा झाला की घर लगेच घाण होऊन जातं. यामुळे   घरात झुरळं, पाली, माश्या, मुंग्या अशा वेगवेगळ्या किटकांचा सुळसुळाट होतो. आरोग्याच्या दृष्टीनेही असे किटक घरात असणं बरं नाही. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त कसा करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो(Natural Ways To Keep Spiders Out Of Your House).

घरातील कोळी आणि त्यांचे जाळे ठिकठिकाणी भिंतींवर पसरल्याने घर दिसताना अगदीच अस्वच्छ दिसते. यासोबतच सण - उत्सवात ही जाळी काढणे (4 natural ways to keep spiders out of your house) हा एक मोठा टास्कच असतो. कारण कोळी फक्त भिंतींवर जाळे बनवून घर घाण करत नाही तर अनेकवेळा आपल्याला चावतात. अशावेळी घरातून हे कोळी व त्यांचे जाळे स्वच्छ कारण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कोळी व त्यांचे जाळे हे घरातील कानाकोपऱ्यात पसरलेले असते, अशावेळी ते स्वच्छ करुन काढणे फारच अवघड काम होते. यासाठी काही सोपे घरगुती उपाय वापरुन आपण घरातील भिंतींवरील कोळी (How to Keep Spiders Away) व त्यांचे जाळे सहजरित्या काढू शकतो(How To Get Rid of Spiders at Home and Home Remedies on How to Deal with Spider Mites).

१. स्पायडर रिपेलेंट स्प्रे कसा बनवायचा ? 

कोळी विशिष्ट प्रकारचा उग्र वास सहन करु शकत नाहीत. तो उग्र वास सतत त्यांना येत राहिल्यास ते त्या ठिकाणाहून आपले जाळे सोडून निघून जातात. यासाठी लसणाच्या ५ ते ६ पाकळ्या थोड्या ठेचून घेऊन पाण्यांत मिसळून त्याचे द्रावण तयार करावे. हे द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून कोळ्यांच्या जाळ्यावर फवारून घ्यावे. लसूण पाकळ्यांच्या उग्र वासामुळे कोळी आपले जाळे सोडतात. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण या स्प्रेची फवारणी करु शकता. 

सोफ्याचे कव्हर न काढताच १ सोपी ट्रिक वापरुन झटपट करा सोफा कव्हर स्वच्छ...सोफा दिसेल नव्यासारखा...

२. लिंबू आणि संत्र्याच्या सालींचा वापर :- लिंबू आणि संत्री यांसारख्या लिंबूवर्गीय फळांच्या सालींचा अतिशय तीव्र वास येतो. कोळी हा वास जास्त काळ सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत कोळ्याचे जाळे जिथे असेल तिथे ही साले ठेवून द्यावीत. लिंबू आणि संत्र्याच्या सालीच्या उग्र वासाने कोळी आपले जाळे सोडतात. 

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

३. व्हिनेगरचा असा करा वापर :- घराच्या व किचनच्या स्वच्छतेसाठी जसा आपण व्हिनेगरचा वापर करतो तसेच कोळ्यांना घालवण्यासाठी देखील आपण याचा वापर करु शकतो. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी व व्हिनेगर समप्रमाणांत मिसळून कोळ्याच्या जाळ्यांवर स्प्रे केल्याने घरातील सर्व कोळी नष्ट होतात. 

किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

४. स्वच्छतेची काळजी घ्या :- कोळी घरात जाळे तयार करत नाहीत याची खात्री करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी भिंतींवरची धूळ झाडून घ्यावी. तसेच घरातील खराब झालेले किंवा बुरशी लागलेले भाग लवकरात लवकर दुरुस्त करा, कारण अशा ठिकाणी किटक जास्त वेगाने वाढतात आणि कोळी अन्नाच्या शोधात त्यांचा पाठलाग करतात.

Web Title: How to get rid of spiders and cobwebs from your house, How to Keep Spiders Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.