Lokmat Sakhi >Social Viral > कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

Ring Around the Collar ? How to Remove It From Your Shirt Collar : वारंवार धुतल्यानंतरही शर्टाच्या कॉलरवर राहतात जिद्दी डाग ? हे जिद्दी डाग घालवण्यासाठी काही घरगुती सोपे पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 03:54 PM2023-08-24T15:54:02+5:302023-08-24T16:17:31+5:30

Ring Around the Collar ? How to Remove It From Your Shirt Collar : वारंवार धुतल्यानंतरही शर्टाच्या कॉलरवर राहतात जिद्दी डाग ? हे जिद्दी डाग घालवण्यासाठी काही घरगुती सोपे पर्याय...

How to Get Rid of Those Collar Stains Once and For All. | कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

धुतलेले स्वच्छ कपडे छान, कडक इस्त्री करुन घालायला सगळ्यांनाच आवडतात. परंतु मळके, डाग असलेले कपडे घालणे कुणीच पसंत करत नाही. कपड्यांवरील डागांचा विचार केल्यास शर्टच्या कॉलरवर असणारे हट्टी डाग लगेच निघत नाही. शर्ट कितीही वेळा घासून स्वच्छ धुतले तरीही त्याच्या कॉलरवरील जिद्दी डाग सहजरित्या निघत नाहीत. शर्टाच्या कॉलरसोबतच, हाताच्या कफ किंवा अंडरआर्म्सवर असणारे डाग हे देखील लपवणे सोपे नाही. शर्टावर असणारे असे हट्टी डाग (How to clean a shirt collar) काढणे सोपे काम नाही. 

शर्टावरचे हे हट्टी डाग (How to clean a shirt collar) कायमचे काढून टाकण्यासाठी आपण वेगवेगळ्या डिटर्जंट पावडर, लिक्विड डिटर्जंट, किंवा साबणाचा वापर करतो. अशा असंख्य वेगवेगळ्या उपायांचा वापर करून हे कॉलरवरचे हट्टी डाग तुलनेनं कमी होतात परंतु कायमचे जात नाही. अशावेळी महागडे डिटर्जंट, साबण यांचा वापर करून फारसा फायदा होत नाही. अशा परिस्थितीत, शर्टाच्या कॉलरसोबतच  हाताच्या कफ किंवा अंडरआर्म्सवर पडलेले डाग काढण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करु(How to Get Rid of Those Collar Stains Once and For All).

१. सौम्य डिटर्जंटचा वापर कसा करावा... 

सहसा आपण शर्ट धुताना तो शर्ट संपूर्णपणे डिटर्जंटमध्ये भिजवतो. पण जर कॉलरवर घाण असेल तर ती स्वतंत्रपणे साफ करणे खूप आवश्यक आहे. अशावेळी त्यासाठी डिटर्जंटचे द्रावण तयार करून कॉलरवर लावा आणि २० ते ३० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे कॉलरवरील मळ स्वच्छ केला जातो, त्यानंतर तो स्क्रब केल्यावर अगदी सहज निघतो.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

२. हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करा... 

कपड्यांवरील हट्टी डाग काही मिनिटांत काढून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हायड्रोजन पेरोक्साइडने स्वच्छ करणे. यासाठी सुमारे एक लिटर पाण्यात २ ते ३ चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळून द्रावण तयार करा. आता या तयार झालेल्या द्रावणात मळक्या कॉलरचा भाग किमान १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. यानंतर एखाद्या सौम्य डिटर्जंट किंवा साबणाने शर्ट पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावा. 

३. शॅम्पू व डिशवॉशनेही कॉलर चमकते... 

कॉलरच्या स्पॉट क्लीनिंगसाठी आपण डिटर्जंटऐवजी शॅम्पू आणि डिशवॉशिंग डिटर्जंटचे द्रावण देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात शॅम्पू आणि डिशवॉश एकत्र करून द्रावण तयार करा. त्यानंतर टूथब्रशच्या मदतीने कॉलरवर हे मिश्रण लावून घ्यावे. साधारण अर्ध्या तासानंतर ब्रशने घासून मग स्वच्छ पाण्याने शर्ट पुन्हा एकदा धुवून घ्यावे. 

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

४. व्हाईट व्हिनेगरचा असा करा वापर... 

पांढऱ्या व्हिनेगरचा वापर डाग काढण्यासाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. काहीवेळा जर आपल्या शर्ट किंवा ड्रेसच्या कॉलरवरचा डाग बराच वेळ धुवूनही साफ होत नसेल तर आपण व्हाईट व्हिनेगरने हे हट्टी डाग दूर करू शकता. यासाठी काही पाण्यात व्हिनेगर टाकून कॉलर भिजवा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून कॉलर साफ करून घ्यावी. 

रोजचे टॉवेल वापरून कापड झाले कडक व खराब ? टॉवेल धुण्याच्या टिप्स, कापड राहील मऊसूत...

नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, नाहीतर एम्ब्रॉयडरी होईल खराब...

५. कॉलरवर हट्टी डाग पडू नयेत म्हणून नेमके काय करावे ? 

मानेवर घाम, तेल आणि घाण यामुळे कॉलरवर हट्टी तेलकट डाग पडतात. अशा परिस्थितीत, जर आपल्याला कॉलरवर हे हट्टी डाग पडू द्यायचे नसतील तर आपल्या शरीराच्या स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी. मानेवर येणारा घाम कमी करण्यासाठी पावडरचा वापर करावा. तसेच, गडद रंगाचा शर्ट घातल्याने हा त्रास कमी होऊ शकतो, कारण त्यात डाग फारसे दिसत नाहीत.

Web Title: How to Get Rid of Those Collar Stains Once and For All.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.