Lokmat Sakhi >Social Viral > कितीही घासलं तरी टॉयलेट पिवळंच दिसतं? ३ सोपे उपाय, टॉयलेट चमकेल स्वच्छ-दुर्गंधी गायब

कितीही घासलं तरी टॉयलेट पिवळंच दिसतं? ३ सोपे उपाय, टॉयलेट चमकेल स्वच्छ-दुर्गंधी गायब

Cleaning Tips For Toilet Seat: कितीही घासून घेतलं तरीही टॉयलेटवरचे पिवळट डाग निघतच नसतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get rid of yellow stains from toilet seat?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 16:22 IST2025-02-07T15:15:07+5:302025-02-07T16:22:26+5:30

Cleaning Tips For Toilet Seat: कितीही घासून घेतलं तरीही टॉयलेटवरचे पिवळट डाग निघतच नसतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get rid of yellow stains from toilet seat?)

how to get rid of yellow stains from toilet seat, best home remedies to clean toilet seat, how to remove yellowish stains from toilet seat | कितीही घासलं तरी टॉयलेट पिवळंच दिसतं? ३ सोपे उपाय, टॉयलेट चमकेल स्वच्छ-दुर्गंधी गायब

कितीही घासलं तरी टॉयलेट पिवळंच दिसतं? ३ सोपे उपाय, टॉयलेट चमकेल स्वच्छ-दुर्गंधी गायब

Highlightsतुमच्या घरातल्या टॉयलेटवरही अशाच पद्धतीचे पिवळट डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा..

तुम्ही घर खरोखरच स्वच्छ ठेवता की फक्त पाहूणे आल्यावर घराची वरवर स्वच्छता करता याचा परफेक्ट अंदाज जर घ्यायचा असेल तर तो तुमच्या घरातल्या टॉयलेट बाथरुमवरून येतो. ज्यांना मुळातच घर स्वच्छ ठेवण्याची सवय असते त्यांच्या घरातलं टॉयलेट बाथरुमही अतिशय स्वच्छ असतात. पण बऱ्याचदा असं होतं की बोअरिंगच्या पाण्यामुळे किंवा टॉयलेट साफ करण्यासाठी रोज पुरेसा वेळ न काढता आल्याने त्याच्यावर डाग पडतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं की मग ते डाग अधिक गडद पिवळे होतात. अशा पद्धतीचं टॉयलेट वापरायला खूप घाण वाटतं. म्हणूनच त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवं (best home remedies to clean toilet seat). तुमच्या घरातल्या टॉयलेटवरही अशाच पद्धतीचे पिवळट डाग पडले असतील (how to remove yellowish stains from toilet seat?) तर ते स्वच्छ करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा..(how to get rid of yellow stains from toilet seat?)

 

टॉयलेट सीटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचा उपाय

१. पहिला उपाय करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. कारण बेकिंग सोडा हा एक उत्तम क्लिंझिंग एजंट म्हणून ओळखला जातो.

दिवसभर उभ्याने काम करून पाय गळून जातात- पाठ दुखते? बघा थकवा घालवणारा १ खास उपाय

हा उपाय करण्यासाठी गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा. यानंतर हे पाणी पिवळट पडलेल्या टॉयलेट सीटवरच्या डागांवर टाका. १० मिनिटांनी त्यावर व्हिनेगर ओता आणि ब्रशने डाग घासून काढा. डाग पुर्णपणे निघाले नाही तर पुन्हा एकदा हा उपाय करून पाहा.

 

२. दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडी बोरेक्स पावडर लागणार आहे. ही पावडर एका वाटीत घ्या आणि त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण तुमच्या कमोड सीटवर टाका आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर एखाद्या चांगल्या ब्रशच्या मदतीने  डाग घासून काढा. टॉयलेट सीट लगेचच स्वच्छ होऊन चमकेल.

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी घेऊन येणारी ५ रोपं, कमीतकमी काळजी घेऊनही वाढतील भराभर..

३. ग्लिसरीन आणि व्हिनेगर सारख्या प्रमाणात एकत्र करा आणि त्यानंतर ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे टॉयलेट सीटवरच्या पिवळ्या डागांवर शिंपडा. त्यानंतर ५ ते ६ मिनिटांनी त्यावर गरम पाणी थोडं थोडं करून टाका आणि डाग घासून स्वच्छ करा. 
 

Web Title: how to get rid of yellow stains from toilet seat, best home remedies to clean toilet seat, how to remove yellowish stains from toilet seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.