Lokmat Sakhi >Social Viral > मुलांचे पांढरे गणवेश काही दिवसांतच पिवळट- काळपट दिसतात? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखे चमकतील

मुलांचे पांढरे गणवेश काही दिवसांतच पिवळट- काळपट दिसतात? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखे चमकतील

Best Trick To Clean White Clothes: ज्यांच्याकडे शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांना हा अनुभव येतोच.. म्हणूनच मुलांचा गणवेश धुण्यासाठी या ट्रिक्स वापरा..(how to get rid of yellowish shade from white clothes?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 18:00 IST2025-02-04T17:57:22+5:302025-02-04T18:00:48+5:30

Best Trick To Clean White Clothes: ज्यांच्याकडे शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांना हा अनुभव येतोच.. म्हणूनच मुलांचा गणवेश धुण्यासाठी या ट्रिक्स वापरा..(how to get rid of yellowish shade from white clothes?)

how to get rid of yellowish shade from white clothes, how to wash white clothes, best trick to clean white clothes | मुलांचे पांढरे गणवेश काही दिवसांतच पिवळट- काळपट दिसतात? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखे चमकतील

मुलांचे पांढरे गणवेश काही दिवसांतच पिवळट- काळपट दिसतात? 'या' पद्धतीने धुवा- नव्यासारखे चमकतील

Highlightsअशा पद्धतीने जर तुम्ही मुलांचे पांढरे कपडे धुतले तर ते नेहमीच स्वच्छ आणि चमकदार दिसतील. त्यांच्यावर पिवळट, काळपट झाक येणार नाही. 

पांढऱ्या रंगाचे किंवा फिक्या रंगाचे कोणतेही कपडे मेंटेन करणं ही खरोखरच खूप अवघड गोष्ट असते. कारण आपल्याकडून नकळत त्यावर काही सांडतं किंवा त्याला कशाचा तरी डाग लागतो आणि मग तो स्वच्छ करणं खूप अवघड होतं. शिवाय पांढरे कपडे जर व्यवस्थित काळजीपुर्वक आणि थोडा वेळ देऊन व्यवस्थित धुतले नाहीत तर लगेच त्यावर एक पिवळट, मळकट रंगाची झाक दिसू लागते. असे कपडे मग काही महिन्यांतच जुनाट होऊन जातात. त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस तरी पांढरा गणवेश घालावाच लागतो. पांढरे कपडे जिथे मोठ्या मंडळींकडूनच लवकर खराब होतात तिथे लहान मुलांची काय बात.. त्यांचे कपडे लवकर मळतातच. शिवाय त्यावर अन्नपदार्थांचे, शाईचे डागसुद्धा लागतात (best trick to clean white clothes). म्हणूनच मुलांचे पांढरे गणवेश धुताना थोडी विशेष काळजी घ्यायला हवी (how to wash white clothes?). ती नेमकी कशी घ्यावी ते पाहूया..(how to get rid of yellowish shade from white clothes?)

 

मुलांचे पांढरे कपडे धुताना काय काळजी घ्यावी?

१. मुलांचे पांढरे कपडे कधीही इतर फिकट रंगाच्या कपड्यांसोबत धुवू नका. तो कपडा तेवढा एकटा स्वतंत्रपणे धुवून टाकावा.

फक्त ९९ रुपयांत घ्या अर्धा डझन कानातले, रोजच्या वापरासाठी नाजुक कानातल्यांची स्वस्तात मस्त खरेदी

२. पांढरे कपडे धुण्यासाठी सगळ्यात आधी एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे लिंबाचा रस घाला. या मिश्रणात आता अर्धा तास तरी कपडा भिजत ठेवावा.

 

३. साधारण अर्ध्या तासानंतर त्या मिश्रणात १ चमचा डिटर्जंट घालावे आणि पुन्हा एकदा सगळं पाणी हलवून त्यात पांढरा कपडा १५ मिनिटांसाठी भिजत घालावा.

सगळ्याच स्वयंपाकासाठी सरसकट एकच तेल वापरता? तुम्ही चुकताय.. पदार्थानुसार करा तेलाची निवड 

४. त्यानंतर कपडा पाण्यातून बाहेर काढा आणि ब्रशने व्यवस्थित घासून पुन्हा स्वच्छ पाण्यातून चांगला खळबळून काढा. अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांचे पांढरे कपडे धुतले तर ते नेहमीच स्वच्छ आणि चमकदार दिसतील. त्यांच्यावर पिवळट, काळपट झाक येणार नाही. 

 

Web Title: how to get rid of yellowish shade from white clothes, how to wash white clothes, best trick to clean white clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.