Lokmat Sakhi >Social Viral > गाद्यांवर पडलेले डाग -घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल...

गाद्यांवर पडलेले डाग -घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल...

How to get ride of bad odor from mattress with homemade spray : How to Get Bad Odors Out of a Mattress : How to Freshen and Deodorize a Mattress Quickly : रोजच्या वापरातील गादी स्वच्छ करण्यासाठी करुन पहा घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 06:24 PM2024-11-22T18:24:26+5:302024-11-22T18:35:33+5:30

How to get ride of bad odor from mattress with homemade spray : How to Get Bad Odors Out of a Mattress : How to Freshen and Deodorize a Mattress Quickly : रोजच्या वापरातील गादी स्वच्छ करण्यासाठी करुन पहा घरगुती उपाय...

How to get ride of bad odor from mattress with homemade spray How to Get Bad Odors Out of a Mattress How to Freshen and Deodorize a Mattress Quickly | गाद्यांवर पडलेले डाग -घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल...

गाद्यांवर पडलेले डाग -घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल...

आपल्यापैकी कित्येकजणांना मऊ गादीवर पडल्याशिवाय झोपच येत नाही. काहीजणांना कायम गादीवर झोपण्याची सवय असते. काहीवेळा तर आपण या गादीवर जेवण्यापासून झोपण्यापर्यंत रोजची अनेक काम करतो. यामुळे रोज वापरुन या गाद्या खराब होतात, मळतात. या गाद्या रोज वापरुन मळल्या की खराब दिसतात आणि त्यातून कुबट दुर्गंधी देखील येऊ लागते. एवढंच नाही तर आपण रोज या गादीवर झोपतो तेव्हा आपला घाम, धूळ इतर गोष्टींमुळे गादीवर डाग पडून दुर्गंधी येऊ लागते. आपण रोज झोपण्यासाठी गादीचा वापर करतो परंतु या गादीची स्वच्छता करायची म्हटलं की प्रश्न पडतो. गादीवर पडलेले डाग आणि येणारी कुबट दुर्गंधी यामुळे आपल्याला काहीवेळा झोपच लागत नाही(How to Freshen and Deodorize a Mattress Quickly).

रोज वापरली जाणारी गादी जर खराब झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी आपण महागड्या क्लिनिंग स्प्रेचा वापर करतो. गाद्यांवरील डाग आणि कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी महागड्या क्लिनिंग स्प्रेचा वापर करण्यापेक्षा आपण घरातील नैसर्गिक पदार्थाचा वापर करु शकतो. महागड्या क्लिनिंग स्प्रेमध्ये असणारे अनेक केमिकल्सयुक्त घटक आणि रसायन यामुळे आपल्या स्किन प्रॉब्लेम किंवा इतर समस्या होऊ शकतात. यासाठीच, रोजच्या वापरातील गादी स्वच्छ करण्यासाठी आपण घरगुती उपाय नेमके काय करु शकतो, ते पाहूयात(How to get ride of bad odor from mattress with homemade spray).

रोजच्या वापरातील गाद्या स्वच्छ करण्यासाठी... 

१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर स्प्रे :- बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीने आपण रोजच्या वापरातील गाद्यांची स्वच्छता करु शकता. यासाठी एका मोठ्या स्प्रे बॉटलमध्ये एक कप डिस्टिल्ड वॉटर घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घालावे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार कोणत्याही एसेंशियल ऑईलचे ३ ते ४ थेंब घालावेत. असे क्लिंझिंग द्रावण तयार करुन घ्यावे. स्प्रे बॉटलमधून आपण हे द्रावण गाद्यांवर स्प्रे करुन घ्यावे. त्यानंतर गाद्या उन्हात वाळत ठेवाव्यात. 

हिवाळ्यात गोठलेल्या खोबरेल तेलाचं करायचं काय? २ ट्रिक्स, तेल गोठणारच नाही-ऐनवेळी टळेल धावपळ...

२. लिंबाचा रस आणि टी ट्री ऑईल :- गाद्या स्वच्छ करण्यासोबतच त्यातील बॅक्टेरिया मारुन टाकण्यासाठी आपण लिंबाचा रस आणि टी ट्री ऑईलचा वापर करु शकता. सगळ्यात आधी एका मोठ्या स्प्रे बॉटलमध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालावे. आता या द्रावणात लिंबाचा रस आणि टी ट्री  ऑईलचे ५ ते ६ थेंब घालूंन हे द्रावण एकत्रित मिक्स करुन घ्यावे. हे द्रावण गादीवर स्प्रे करुन घ्यावे. त्यानंतर या गाद्या संपूर्णपणे वाळवून घ्याव्यात. 

ना रुम हिटरची गरज ना शेकोटीची, ५ ट्रिक्स-थंडीतही घर राहील उबदार-विजेचीही होईल बचत...

३. काकडी आणि एलोवेरा जेलचा स्प्रे :- रोज वापरुन गाद्यांना येणारी कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी आपण काकडी आणि एलोवेरा जेलचा वापर करु शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात एलोवेरा जेल आणि काकडीचा रस एकत्रित घेऊन मिक्स करावा. आता स्प्रे बॉटलच्या मदतीने आपण गाद्यांना येणारी कुबट दुर्गंधी अगदी सहजपणे घालवू शकता. 

 अशाप्रकारे आपण महागड्या क्लिनिंग स्प्रेचा वापर न करता देखील रोजच्या वापरातील गाद्या स्वच्छ करुन त्यातील कुबट दुर्गंधी घालवू शकता.

Web Title: How to get ride of bad odor from mattress with homemade spray How to Get Bad Odors Out of a Mattress How to Freshen and Deodorize a Mattress Quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.