Join us

फक्त १ रुपयांत घालवा कफ - कॉलरवरचे हट्टी, काळेकुट्ट डाग, मळके शर्टही होतील नव्यासारखे पांढरेशुभ्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 17:11 IST

How To Get Stain Out of Collars & Cuffs : The Secret to Removing White Shirt Collar & Cuffs Stains : How to Remove Collar Stains & Clean Dirty Cuffs in 5 minutes : वारंवार धुतल्यानंतरही शर्टाच्या कफ कॉलरवर राहतात हट्टी डाग ? हे डाग घालवण्यासाठी स्वस्तात मस्त सोपा उपाय...

पांढऱ्या शर्टवरील कोणत्याही प्रकारचे डाग काढणे म्हणजे महाकठीण काम असते. असे पांढरे शर्ट वेळीच धुवून स्वच्छ केले नाही तर त्यावर अजून डाग पडून ते फारच मळके दिसते. धुतलेले स्वच्छ कपडे छान, कडक इस्त्री करुन घालायला सगळ्यांनाच आवडतात. परंतु मळके, डाग असलेले कपडे घालणे कुणीच पसंत करत नाही. कपड्यांवरील डागांचा (How To Get Stain Out of Collars & Cuffs) विचार केल्यास शर्टच्या कॉलरवर असणारे हट्टी डाग लगेच निघत नाही. शर्ट कितीही वेळा घासून स्वच्छ धुतले तरीही त्याच्या कॉलरवरील जिद्दी डाग सहजरित्या निघत नाहीत. शर्टाच्या कॉलरसोबतच, हाताच्या कफ किंवा अंडरआर्म्सवर असणारे डाग हे देखील लपवणे सोपे नाही. शर्टावर असणारे असे हट्टी डाग काढणे सोपे काम नाही(The Secret to Removing White Shirt Collar & Cuffs Stains).

शर्टावरचे हे हट्टी डाग कायमचे काढून टाकण्यासाठी आपण वेगवेगळ्या डिटर्जंट पावडर, लिक्विड डिटर्जंट, किंवा साबणाचा वापर करतो. अशा असंख्य वेगवेगळ्या उपायांचा वापर करून हे कॉलरवरचे हट्टी डाग तुलनेने कमी होतात परंतु कायमचे जात नाही. अशावेळी महागडे डिटर्जंट, साबणाचा वापर करून फारसा फायदा होत नाही. अशा परिस्थितीत, शर्टाच्या कॉलरसोबतच हाताच्या कफ किंवा अंडरआर्म्सवर पडलेले डाग काढण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करु( How to Remove Collar Stains & Clean Dirty Cuffs in 5 minutes).

१. शाम्पू :- कफ, कॉलरच्या स्पॉट क्लीनिंगसाठी आपण डिटर्जंटऐवजी शाम्पूचा देखील वापर करु शकतो. शाम्पूचे द्रावण तयार करण्यासाठी एका भांड्यात शाम्पू आणि पाणी समप्रमाणात घेऊन एकत्रित करून द्रावण तयार करून घ्यावे. त्यानंतर टूथब्रशच्या मदतीने कफ, कॉलरवर हे मिश्रण लावून घ्यावे. साधारण अर्ध्या तासानंतर ब्रशने घासून मग स्वच्छ पाण्याने शर्ट पुन्हा एकदा धुवून घ्यावे. 

आता कितीही कपडे धुतले तरीही साबण संपणार नाही, विकत घ्या १३० रुपयांचे 'सोप रोलर', होईल पैशांची बचत!

२. सौम्य डिटर्जंट :- सहसा आपण शर्ट धुताना तो शर्ट संपूर्णपणे डिटर्जंटमध्ये भिजवतो. पण जर कॉलरवर घाण असेल तर ती स्वतंत्रपणे साफ करणे खूप आवश्यक आहे. अशावेळी त्यासाठी डिटर्जंटचे द्रावण तयार करून कॉलरवर लावा आणि २० ते ३० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे कॉलरवरील मळ स्वच्छ केला जातो, त्यानंतर तो स्क्रब केल्यावर अगदी सहज निघतो.

३. हायड्रोजन पेरोक्साईड :- कपड्यांवरील हट्टी डाग काही मिनिटांत काढून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हायड्रोजन पेरोक्साइडने स्वच्छ करणे. यासाठी सुमारे एक लिटर पाण्यात २ ते ३ चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळून द्रावण तयार करा. आता या तयार झालेल्या द्रावणात मळक्या कॉलरचा भाग किमान १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. यानंतर एखाद्या सौम्य डिटर्जंट किंवा साबणाने शर्ट पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावा.

ही मंगळसूत्र अंगठी पाहिली का? मंगळसूत्र डिझाइन्सच्या अंगठ्यांचा पाहा खास नवा ट्रेंड...

४.  व्हाईट व्हिनेगर :- पांढऱ्या व्हिनेगरचा वापर डाग काढण्यासाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. काहीवेळा जर आपल्या शर्ट किंवा ड्रेसच्या कॉलरवरचा डाग बराच वेळ धुवूनही साफ होत नसेल तर आपण व्हाईट व्हिनेगरने हे हट्टी डाग दूर करू शकता. यासाठी काही पाण्यात व्हिनेगर टाकून कॉलर भिजवा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून कॉलर साफ करून घ्यावी. 

आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...

 कॉलरवर हट्टी डाग पडू नयेत म्हणून नेमके काय करावे ? 

मानेवर घाम, तेल आणि घाण यामुळे कॉलरवर हट्टी तेलकट डाग पडतात. अशा परिस्थितीत, जर आपल्याला कॉलरवर हे हट्टी डाग पडू द्यायचे नसतील तर आपल्या शरीराच्या स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी. मानेवर येणारा घाम कमी करण्यासाठी पावडरचा वापर करावा. तसेच, गडद रंगाचा शर्ट घातल्याने हा त्रास कमी होऊ शकतो, कारण त्यात डाग फारसे दिसत नाहीत.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स