Join us  

घामामुळे पांढरे सॉक्स काळेकुट्ट झालेत? ५ घरगुती उपाय, सॉक्स दिसतील नव्यासारखे पांढरेशुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 3:26 PM

How to get white socks white again पांढऱ्या सॉक्सवरील डाग काढणं मोठं अवघड काम, मोजे लगेच खराब होतात त्यासाठीच हे सोपे उपाय

उन्हाळ्यात गर्मीमुळे कपडे अधिक खराब होतात व त्यातून दुर्गंधी पसरते. घामामुळे कपड्यांवर घामाचे डाग पडतात. व हे डाग सहसा लवकर निघत नाही. कपड्यांपेक्षा सॉक्स लवकर काळपट पडतात. स्कूल असो किंवा ऑफिस प्रत्येक जणांना बुटाच्या आत सॉक्स घालायला लागतेच. उन्हाळ्यात पायांमधून प्रचंड घाम येतो. ज्यामुळे मोज्यांमधून दुर्गंधी येते. यासह सॉक्सवर काळपट डाग पडतात.

पांढऱ्या सॉक्सवर हे डाग अधिक ठळक दिसतात. सॉक्स धुतल्यानंतर त्यामधून दुर्गंधी निघून जाते, परंतु काळपट डाग निघत नाही. हे डाग काढण्यासाठी आपण सॉक्सला ब्रशने घासतो, पण अशाने ते लवकर खराब होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या काही घरगुती टिप्स फॉलो करा. या ट्रिक्समुळे सॉक्समधून काळपट डाग निघून जातील. व सॉक्स नव्यासारखे दिसतील(How to get white socks white again).

बेकिंग सोडा

सॉक्सवरील डाग साफ करण्यासाठी, एका भांड्यात पाणी घ्या, त्यात दोन चमचे बेकिंग पावडर मिसळून पेस्ट तयार करा. व या मिश्रणात सॉक्स २ तासांसाठी भिजत ठेवा. नंतर त्यांना हलक्या हातांनी चोळून, डिटर्जंटच्या पाण्याने स्वच्छ करा. शेवटी सॉक्सवर व्हिनेगर टाका आणि थोडा वेळ ठेवा, नंतर पाण्याने धुवा. यामुळे मोजे नव्यासारखे दिसतील.

मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

लिंबू

मोजे स्वच्छ करण्यासाठी एका पॅनमध्ये 3-4 ग्लास पाणी गरम करा. त्यात लिंबाचा रस आणि डिश वॉश साबण घालून मिश्रण तयार करा. या कोमट पाण्याच्या मिश्रणात मोजे २० मिनिटे भिजत ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे मोजे धुवा.

पांढरे व्हिनेगर

घाणेरडे सॉक्स स्वच्छ करण्यासाठी, पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळवत ठेवा. यामध्ये एक कप व्हाईट व्हिनेगर घाला, त्यात मोजे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मोजे धुवून टाका.

पाणी लागल्याने खराब होतो म्हणून लायटर स्वच्छच करत नाही? ५ टिप्स-चिकट लायटर होईल चकाचक

ब्लीच

मोजे स्वच्छ करण्यासाठी, एक कप कोमट पाण्यात चार चमचे ब्लीच, व एक चमचा डिश वॉश मिसळा. आता मोजे 20 मिनिटे त्यात भिजत ठेवा. नंतर नेहमीच्या पद्धतीने धुवा.

डिश डिटर्जंट

डिश डिटर्जंटने आपण भांडी धुण्यासोबत सॉक्स देखील धुवू शकता. यासाठी कोमट पाण्यात डिश डिटर्जंट घालून मिश्रण तयार करा. त्यात हे मोजे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मोजे पाण्याने धुवा.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल