Lokmat Sakhi >Social Viral > काळेकुट्ट झालेले पायमोजे झटपट स्वच्छ करण्यासाठी ४ सोपे उपाय, सॉक्सचा पांढरा रंग टिकून राहील कायम..

काळेकुट्ट झालेले पायमोजे झटपट स्वच्छ करण्यासाठी ४ सोपे उपाय, सॉक्सचा पांढरा रंग टिकून राहील कायम..

HOW TO GET WHITE SOCKS WHITE AGAIN : पांढऱ्या सॉक्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 10:38 PM2023-09-13T22:38:49+5:302023-09-13T23:03:56+5:30

HOW TO GET WHITE SOCKS WHITE AGAIN : पांढऱ्या सॉक्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय...

HOW TO GET WHITE SOCKS WHITE AGAIN: EASY WAYS TO CLEAN DIRTY SOCKS. | काळेकुट्ट झालेले पायमोजे झटपट स्वच्छ करण्यासाठी ४ सोपे उपाय, सॉक्सचा पांढरा रंग टिकून राहील कायम..

काळेकुट्ट झालेले पायमोजे झटपट स्वच्छ करण्यासाठी ४ सोपे उपाय, सॉक्सचा पांढरा रंग टिकून राहील कायम..

गरमी असो किंवा थंडी, पायासाठी मोजे खूप महत्त्वाचे असतात. हे थंडीत पाय उबदार ठेवते, तर उन्हाळ्यात ते बाहेर पडणारा घाम शोषून घेण्याचे काम करते, त्यामुळे पाय आणि बूटांना दुर्गंधी येत नाही. पायांतील मोजे हे आपल्यापैकी बरेचजण रोज वापरतात. काहीवेळा आपले हे रोजचे मोजे वापरुन वापरुन खराब होतात. आपण शक्यतो पायात पांढऱ्या रंगाचेचे मोजे वापरतो. हे मोजे पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे ते लगेच मळून खराब होतात. असे मळके मोजे आपण कितीही धुतले तरीही ते हवे तसे स्वच्छ होत नाहीत. हे पांढरे मळके मोजे वेळेवर स्वच्छ न धुता तसेच वापरले तर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. असे दुर्गंधी येणारे मळके मोजे आपण वापरु शकत नाही(How To Clean And Brighten Dirty Socks).

मोजे हे शक्यतो पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे ते मळून खराब होऊ नये म्हणून त्यांच्या स्वच्छतेची पण तितकीच काळजी घ्यावी लागते. पायांतील रोजच्या वापरातील पांढरेशुभ्र मोजे दीर्घकाळ तसेच पांढरेशुभ्र ठेवणे खूप कठीण (How to Get White Socks White Again) काम असते. मोजे मळके झाल्यानंतर त्यातील मळ काढताना काहीवेळा त्याच्या फॅब्रिक्सचे देखील नुकसान होऊ शकते. अशावेळी फॅब्रिक्सचे नुकसान होऊ नये परंतु मळके मोजे स्वच्छ (How to whiten white socks at home) व्हावेत यासाठी काही सोप्या टिप्स वापरुन आपण मोजे स्वच्छ करु शकतो(HOW TO GET WHITE SOCKS WHITE AGAIN: EASY WAYS TO CLEAN DIRTY SOCKS).

जुने काळेकुट्ट मोजे स्वच्छ करण्यासाठी काही सोपे उपाय... 

१. लिंबाचा रस व डिशवॉश लिक्विड :- लिंबाचा रस व डिशवॉश लिक्विड या दोन्हीचे एकत्रित मिश्रण तयार करुन घ्यावे. या मिश्रणाचा वापर करुन आपण काळे , मळलेले पायमोजे अगदी सहजरित्या स्वच्छ करु शकता. या मिश्रणाचा वापर करून आपण मोज्यांच्या तळाशी असलेली घाण लगेच काढू शकतो. मोज्यांच्या तळाशी असलेले काळे डाग काढून टाकण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी ३ ते ४ ग्लास पाण्यात लिंबाचा रस घालून हे पाणी उकळा. आता त्यात मोजे भिजवा आणि २५ मिनिटे ते तसेच राहू द्या. नंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि वाळवून घ्यावे. 

सणवारासाठी काचेची भांडी कशी स्वच्छ करावीत ? ५ सोप्या टिप्स, काचेची भांडी दिसतील पुन्हा नव्यासारखी चकचकीत...

२. बेकिंग सोडा, व्हिनेगर, डिटर्जंट :- एका मोठ्या भांड्यात व्हिनेगर घेऊन त्यात  बेकिंग सोडा व डिटर्जंट घालून त्याचे घट्ट मिश्रण तयार करून घ्यावे. आता ही तयार केलेली पेस्ट मोज्यांच्या काळया डागांवर लावून ठेवावी. त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात व्हिनेगर, बेकिंग सोडा, डिटर्जंट व पाणी घेऊन त्याचे द्रावण तयार करावे. आता हे मळके मोजे या द्रावणात २ ते ३ तास भिजत ठेवावेत. त्यानंतर हातांनी चोळून हे मोजे स्वच्छ धुवून घ्यावेत. 

किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...

३. व्हिनेगर व गरम पाणी :- मोज्यावरील काळे डाग काढण्यासाठी आपण व्हिनेगर व गरम पाण्याचा वापर करु शकतो. पाणी गरम करून घेऊन त्यात व्हिनेगर  घालून ते मिसळून मिश्रण तयार करुन घ्यावे. व्हिनेगर व गरम पाण्याच्या मदतीने मोज्यांवरील काळे डाग व घाण निघून जाण्यास मदत होते. 

वीज बिल जास्त येईल म्हणून रोज वॉशिंग मशीन लावत नाही ? ६ टिप्स, रोज मशीन लावूनही वीजबिल येईल कमी...

४. मोज्यांचा पांढरा रंग टिकवून ठेवण्यासाठी :- जर आपल्याला आपले जुने पांढरे मोजे नव्यासारखे चांगले दिसायचे असतील तर ते नेपिसन नॉन बायोलॉजिकल स्टेन रिमूव्हरने स्वच्छ करुन मग ते सौम्य डिटर्जंटने धुवा.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

Web Title: HOW TO GET WHITE SOCKS WHITE AGAIN: EASY WAYS TO CLEAN DIRTY SOCKS.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.