आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक पॅटर्न व कापडाच्या अनेक प्रकारचे कपडे असतात. असे असले तरीही या सगळ्या प्रकारांतून बऱ्याचजणांच्या आवडीचा कापडाचा प्रकार म्हणजे कॉटन. वाढती उष्णता व गर्मी, सतत येणारा घाम या सगळ्यांमुळे आपल्याला हलके व घाम शोषून घेणारे सुती कपडे घालणे योग्य वाटते. कॉटनचे कपडे घातल्याने घाम शोषून शरीराला थंडावा मिळतो. तसे पहायला गेले तर उन्हाळ्यातच नाही तर सगळ्याच ऋतूंमध्ये कॉटनचे कपडे वापरणे सोयीचे ठरते. आपल्यापैकी बरेचजण कपड्यांची खरेदी करताना कॉटनचे कपडे विकत घेण्याला प्राधान्य देतात(How To Iron a Shirt In 2 Minutes).
कॉटनचे कपडे वापरणे हे सोयीचे आणि योग्य असले तरीही त्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. या कपड्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली नाही तर ते लवकर जुने आणि खराब दिसू लागतात. प्रत्येकाकडे कॉटनच्या कपड्यांचे बरेच जोड असतात. कॉटनचे कपडे धुतल्यानंतर बरेचदा ते आकुंचित पावतात, ज्यामुळे इस्त्री करणे ( How to Iron a Shirt Step by Step) खूप कठीण होते. कॉटनचे कपडे (How To Iron a Cotton Shirt Perfectly At Home) असे असतात की त्यांना इस्त्री केल्याशिवाय घातले तर फारच चुरलेले व जुने दिसतात. त्यामुळे आपण शक्यतो कॉटनचे कपडे इस्त्री (How to iron a shirt step-by-step guide) न करता घालणे टाळतोच. कॉटनचे कपडे धुतल्यांनंतर त्यावर येणाऱ्या बारीक सुरकुत्या इस्त्री करुन घालवणे हा खूप मोठा टास्कच असतो. परंतु आपण काही सोप्या टिप्स वापरुन हे कॉटनचे कपडे झटपट इस्त्री करुन पुन्हा पहिल्यासारखे करु शकतो(Ironing hacks: how to iron a shirt in 7 easy steps).
कॉटनच्या शर्टाला इस्त्री करताना लक्षात ठेवा....
१. इस्त्री करताना पाणी शिंपडा :- कॉटनचे कपडे धुतल्यानंतर ते चुरुन त्यावर बारीक अशा सुरकुत्या पडतात. या सुरकुत्या इस्त्री केल्याशिवाय काही जात नाहीत. यासोबतच असे कॉटनचे चुरलेले कपडे घालणे कुणीच पसंत करत नाही. कॉटनच्या चुरलेल्या कपड्यांवर इस्त्री फिरवली तरी काहीवेळा कपड्यांवर इस्त्री व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे कपड्यांवरच्या सुरकुत्या तशाच कायम राहतात. कॉटनच्या कपड्यांवरील या सुरकुत्या घालवण्यासाठी चुरलेल्या कपड्यांवर पाणी शिंपडून थोडा वेळ ते तसेच ठेवून द्यावे, त्यानंतर इस्त्री करुन घ्यावी. पाणी शिंपडल्यामुळे कॉटनच्या कपड्यांवर इस्त्री व्यवस्थित बसते.
२. कॉटनचे शर्ट इस्त्री करताना :- कॉटर्नचे शर्ट इस्त्री करताना सर्वात आधी शर्टची बटन पट्टी आतून आणि बाहेरुन दोन्ही बाजुंनी इस्त्री करुन घ्यावी. त्यानंतर शर्टची सगळी बटणं लावून घ्यावीत व पुन्हा एकदा बटण पट्टीवरुन इस्त्री फिरवावी. आपण अनेकदा पाहतो की सर्वात जास्त कपड्यांना कडक इस्त्री करायची असेल तर ती कॉटनच्या कपड्यांना करावी लागते. कॉटनच्या कपड्यांना आतून आणि बाहेरुन असे दोन्ही बाजून इस्त्री करावी. यामुळे इस्त्री योग्य पद्धतीने होते.
वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये साचला काळा घाण थर ? ३ सोप्या ट्रिक्स, ड्रायर करा चुटकीसरशी स्वच्छ...
३. शर्टची कॉलर इस्त्री करुन घ्यावी :- शर्टच्या कॉलरला इस्त्री करताना कॉलरच्या दोन्ही बाजुंनी इस्त्री फिरवून घ्यावी व कॉलर व्यवस्थित दुमडून घ्यावी.
४. शर्ट इस्त्री करताना :- कॉटनचे शर्ट इस्त्री करताना सर्वात आधी बॅक साईड इस्त्री करुन घ्यावी, जेणेकरुन पुढची साईड व्यवस्थित इस्त्री करुन शर्ट योग्य पद्धतीने घडी घालता येऊ शकतो.
वीज बिल जास्त येईल म्हणून रोज वॉशिंग मशीन लावत नाही ? ६ टिप्स, रोज मशीन लावूनही वीजबिल येईल कमी...
५. स्लिव्ह्ज इस्त्री करा :- कॉटनच्या शर्टचे स्लिव्ह्ज इस्त्री करताना ते पुढून व मागून अशा दोन्ही बाजुंनी इस्त्री करुन घ्यावेत. त्यानंतर कफचे बटण लावून मग त्यावरून दोन्ही बाजुंनी इस्त्री करुन घ्यावी.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
६. शोल्डर आणि फ्रंट साईड :- कॉटनच्या शर्टला इस्त्री करताना सगळ्यात शेवटी शोल्डर आणि फ्रंट साईड इस्त्री करुन घ्यावी. यामुळे शर्ट व्यवस्थित इस्त्री केला जाऊ शकतो.
७. तापमान सेट करा :- कपडे इस्त्री करताना इस्त्रीचे तापमान सेट करण्यास विसरू नका. इस्त्री नॉर्मल मोडवर ठेवल्याने इस्त्री जास्त गरम होते. त्यामुळे हलके कपडे जळण्याची भीती आहे. अशावेळी कपड्यांचे फॅब्रिक लक्षात घेऊनच इस्त्रीचे तापमान सेट करावे.