Lokmat Sakhi >Social Viral > ॲल्युमिनियम फॉईलने कपड्यांना एकदम कडक इस्त्री करण्याची भन्नाट ट्रिक- कपड्यांवरच्या सुरकुत्या गायब 

ॲल्युमिनियम फॉईलने कपड्यांना एकदम कडक इस्त्री करण्याची भन्नाट ट्रिक- कपड्यांवरच्या सुरकुत्या गायब 

How To Iron Clothes Using Aluminium Foil: इस्त्री करण्यासाठी कधी ॲल्युमिनियम फॉईलचा उपयोग तुम्ही करून पाहिला आहे का?(simple trick to iron cotton clothes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 09:07 AM2024-06-25T09:07:03+5:302024-06-25T09:10:02+5:30

How To Iron Clothes Using Aluminium Foil: इस्त्री करण्यासाठी कधी ॲल्युमिनियम फॉईलचा उपयोग तुम्ही करून पाहिला आहे का?(simple trick to iron cotton clothes)

how to iron clothes using aluminium foil, simple trick to iron cotton clothes, how to make cotton clothes wrinkle free | ॲल्युमिनियम फॉईलने कपड्यांना एकदम कडक इस्त्री करण्याची भन्नाट ट्रिक- कपड्यांवरच्या सुरकुत्या गायब 

ॲल्युमिनियम फॉईलने कपड्यांना एकदम कडक इस्त्री करण्याची भन्नाट ट्रिक- कपड्यांवरच्या सुरकुत्या गायब 

Highlightsही युक्ती कॉटनच्या कपड्यांना इस्त्री करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे..

कपड्यांना इस्त्री करणं हे काम काही जणांना खूप किचकट वाटतं. हे काम आवडत नसेल किंवा आपल्याला ते परफेक्ट येत नसेल तर कपडे बाहेर लॉण्ड्रीला देणं हा एक पर्याय आहेच. पण वेळेअभावी ते ही अनेकदा शक्य होत नाही. शिवाय कपडे बाहेर इस्त्रीसाठी द्यायचे झालं तरी एका कपड्यासाठी साधारण ७ ते १० रुपये मोजावे लागतात (simple trick to iron cotton clothes). त्यामुळे मग एवढा पैसा कपडे इस्त्री करण्यासाठी खर्च करणंही नकोसं वाटतं (how to make cotton clothes wrinkle free). तुमचंही असंच असेल तर आता ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करून कपडे झटपट कसे इस्त्री करायचे ते पाहा...(how to iron clothes using aluminium foil)

 

ॲल्यूमिनियम फॉईल वापरून कपड्यांना इस्त्री कशी करायची?

ॲल्युमिनियम फॉईल वापरून कपड्यांना झटपट कशी इस्त्री करावी याचा उपाय alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

माधुरी दीक्षितने सांगितलेला ‘हा’ खास उपाय करा- १५ मिनिटांत त्वचा दिसेल फ्रेश-पार्लरची गरजच नाही

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर जिथे इस्त्री करणार आहात त्या टेबलवर एक जाडसर कपडा ठेवा. त्या कपड्यावर ॲल्युमिनियम फॉईल टाका.

फॉईल खूप मोठ्या आकाराची नसेल तर कपड्याच्या ज्या भागात इस्त्री करायची आहे, फक्त त्या भागाखाली ठेवली तरी चालेल. यानंतर आता कपड्याला इस्त्री करा.

 

आपण कपड्यांना जेव्हा इस्त्री करतो तेव्हा आतून आणि बाहेरून अशा दोन्ही बाजुंनी ती करावी लागते. त्यानंतर कपड्यांवरच्या सगळ्या सुरकुत्या निघून जातात. ॲल्यूमिनियम फॉईल कपड्याखाली टाकून इस्त्री केल्यास कपड्याच्या खालच्या बाजुलाही आपोआपच इस्त्री होऊन जाईल आणि लगेचच दोन्ही बाजुंच्या सुरकुत्या कमी होऊन जातील.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

ही युक्ती कॉटनच्या कपड्यांना इस्त्री करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे, असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अशा पद्धतीने इस्त्री करताना थोडी काळजी घ्या आणि इस्त्री थेट फॉईलला लागणार नाही, याकडे लक्ष द्या. 

 

Web Title: how to iron clothes using aluminium foil, simple trick to iron cotton clothes, how to make cotton clothes wrinkle free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.