लग्नसमारंभानिमित्त किंवा लहान- मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भरजरी कपडे आपण नेहमीच घालतो. गोटा वर्क, सेक्विन वर्क, मिरर वर्क, जर्दोसी वर्क, थ्रेड वर्क अशा पद्धतीचं भरगच्च काम असणारा लेहेंगा, कुर्ता, साडी, ब्लाऊज घरच्याघरी इस्त्री करताना जरा टेन्शन येतं. आपल्याकडून कपडा खराब तर होणार नाही ना, असं वाटतं. त्यामुळे आपण ते इस्त्रीसाठी बाहेर देतो. पण प्रत्येकवेळी त्या ड्रेसवर एवढा पैसे खर्च करणंही जिवावर येतं (How to iron heavy work dress at home?). म्हणूनच अशा भरजरी वर्क असणाऱ्या ड्रेसला घरच्याघरी कशा पद्धतीने इस्त्री करता येते ते पाहा...(3 simple remedies to iron heavy work dress at home)
भरजरी वर्क असणाऱ्या कपड्यांना घरच्याघरी कशी इस्त्री करावी?
वेगवेगळ्या पद्धती वापरून भरजरी कपड्यांना घरच्याघरी इस्त्री करता येते. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा...
१. कपडा उलट करणे
हेवी वर्क असणाऱ्या कोणत्याही कपड्याला इस्त्री किंवा प्रेस करण्याची ही एक सगळ्यात सोपी पद्धत आहे. यासाठी तो कपडा आधी उलटा करा. इस्त्रीचं तापमान जास्त वाढू देऊ नका. ते मिडियमवर सेट करा. त्यानंतर अलगदपणे कपड्यावरून इस्त्री फिरवा.
मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात? बघा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत- केस होतील मऊ, चमकदार
२. ॲल्यूमिनियम फॉईल
ॲल्यूमिनियम फॉईलचा वापर करून भरजरी कपड्यांना इस्त्री करणे हा एक अगदी सुरक्षित आणि उत्तम उपाय आहे. यासाठी कपड्यावर जिथे इस्त्री करायची आहे तिथे ॲल्युमिनियम फॉईल ठेवा आणि त्यावरून अलगदपणे इस्त्री फिरवा.
३. वर्तमानपत्राचा वापर
वर्तमान पत्राचा वापर करूनही भरजरी कपड्यांना खूप छान इस्त्री करता येते. पण वर्तमानपत्राचा वापर करताना काही गोष्टींची काळजी मात्र नक्की घ्या. पहिली गोष्ट म्हणजे कपड्यांना इस्त्री करताना आपण त्यावर पाणी शिंपडतो.
दीपिका पादुकोणसारखी चमकदार फ्लॉलेस त्वचा पाहिजे? करा तिनेच सांगितलेले ३ उपाय, पिंगमेंटशनही टळेल
वर्तमानपत्राने इस्त्री करत असताना असं मुळीच करू नका. कारण ओलाव्यामुळे वर्तमान पत्रावरील शाईचा डाग कपड्यांना लागू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमान पत्राचा वापर करून फिकट कपड्यांना इस्त्री करणे टाळावे. कारण शाईचा डाग लागण्याचा धोका असतोच.