Join us  

प्रिंटेड टीशर्ट इस्त्री करताना वापरा ३ सोप्या ट्रिक्स, प्रिंट्स खराब न होता टिकेल नव्यासारखी दीर्घकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2024 6:58 PM

How To Iron Printed T-Shirts : How to iron a t-shirt without touching the graphic : Taking Care Of Your Printed T-Shirt : Tips & Tricks How To Properly Iron T-Shirts With Print : प्रिंटेड कपड्यांना इस्त्री करताना त्यावरील प्रिंट खराब होऊ नये म्हणून लक्षात ठेवा सोपे उपाय...

एखादा हलका फुलका टी-शर्ट आणि त्याखाली मॅचिंग जीन्स असा साधा लूक सगळ्यांनाच आवडतो. शक्यतो आपण जीन्सवर बहुतेकवेळा पटकन घालता येईल असा टीशर्ट घालणे पसंत करतो. पटकन कुठे बाहेर जायचे असेल तर किंवा झटपट कपडे घालून तयार व्हायचे असेल तर टीशर्ट हा उत्तम पर्याय असतो. टीशर्ट हा कपड्यांचा असा एक प्रकार आहे, की जो अगदी सहजपणे परिधान करायला सोपा असतो. सध्या वेगवेगळ्या सुंदर डिझाईन्स आणि प्रिंट्स असणारे ग्राफिक्स टीशर्ट घालण्याचा एक नवा ट्रेंड सुरु आहे(How to iron printed clothes).

या ग्राफिक्स टीशर्टवरील प्रिंट्स शक्यतो रबराचा वापर करून तयार केलेल्या असतात. टीशर्ट वरील या रबरी प्रिंट्सची काळजी घ्यावी लागते. याची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास असे टी-शर्ट धुताना किंवा त्यांना इस्त्री करताना त्यावरील रबरी प्रिंट खराब होते. अशा टीशर्ट्सना इस्त्री करताना खूप काळजीपूर्वक करावी लागते. काहीवेळा या रबरी प्रिंट्सवर (Tips & Tricks How To Properly Iron T-Shirts With Print) गरम इस्त्री फिरवल्याने या प्रिंट्स (How to iron a t shirt without touching the graphic) खराब होतात किंवा इस्त्रीच्या तळाशी चिकटतात. यासाठीच असे महागडे रबरी प्रिंट्स असणारे टीशर्ट इस्त्री करण्यासाठी आपण सोप्या ट्रिक्सचा वापर करु शकतो. या ट्रिक्सचा वापर करून आपण अगदी सहजपणे रबरी प्रिंट्स असणारे टीशर्ट इस्त्री करु शकतो(Use 3 Easy Tricks When Ironing Printed T-shirts).

रबरी प्रिंट्स असणारे टीशर्ट इस्त्री करताना... 

१. प्रिंटेड टीशर्ट इस्त्री करताना त्यावरील प्रिंट खराब होऊ नये म्हणून आपण अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करू शकता. यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा एका मोठा तुकडा घेऊन तो व्यवस्थित सपाट पृष्ठभागावर ठेवावा. त्यानंतर त्यावर इस्त्री ठेवावी. आता इस्त्रीचा तळ संपूर्णपणे कव्हर होईल अशाप्रकारे अ‍ॅल्युमिनियम फॉईल इस्त्रीला गुंडाळून घ्यावी. त्यानंतर अशा इस्त्रीने प्रिंटेट टीशर्ट इस्त्री करून घ्यावे. 

दिवाळीत खूप खा खा झाली? ६ टिप्स-अपचन आणि पित्ताचा त्रास होईल कमी, करा रिस्टार्ट...

२. प्रिंटेड टीशर्ट इस्त्री करताना टीशर्ट उलटे करुन म्हणजेच आतली बाजू बाहेर काढून, मग त्यावर इस्त्री करावी. यामुळे त्यावरील प्रिंटला थेट इस्त्रीची उष्णता  लागत नाही. यामुळे प्रिंट्स खराब न होता व्यवस्थित इस्त्री केली जाते. 

३. कॉटन रुमालाचा वापर करून देखील आपण प्रिंटेड टीशर्ट सहजपणे इस्त्री करू शकता. यासाठी एक पातळ कॉटन रुमाल घेऊन तो टीशर्टवरील जितक्या भागात प्रिंट्स आहे त्यावर अंथरुन घ्यावा. त्यानंतर त्या रुमालावरुन इस्त्री करावी. इस्त्रीचा पृष्ठभाग आणि प्रिंट्स यामध्ये पातळ रुमाल असल्याने त्यांचा थेट संपर्क येत नाही. यामुळे या टीशर्टवरील प्रिंट्स गरम इस्त्रीला चिकटत नाही.

सणावाराला सतत वापरुन काळीकुट्ट, चिकट झालेली धुपदाणी करा स्वच्छ, १ सोपी युक्ती, फारशी मेहेनत करावी लागणार नाही...

टॅग्स :सोशल व्हायरल