Join us  

सिरॅमिकच्या कुंड्या- कप-शोपीस तुटले तर लगेच फेकू नका, २ ट्रिक्स- चिटकेल चटकन-दिसेल नव्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 3:21 PM

How To Join Broken Ceramic Planters Or Show Pieces: सिरॅमिकची कोणतीही वस्तू तुटली असेल तर ती लगेच फेकून देऊ नका. २ पद्धतींनी ती खूप चांगल्या प्रकारे जोडता येते..(simple hacks for fixing broken coffee mug or ceramic planters)

ठळक मुद्देतुटलेल्या सिरॅमिकच्या वस्तूसुद्धा खूप चांगल्याप्रकारे जोडून पुन्हा वापरता येतात. वस्तू इतकी व्यवस्थित जोडली जाईल की जोड कुठे दिला होता, ते लक्षातही येणार नाही.

काही जणी मोठ्या हौशीने सिरॅमिकच्या वेगवेगळ्या वस्तू विकत घेतात. कुंड्या, शोपीस, क्रॉकरी, कप, फुलदाणी असे वेगवेगळे प्रकार सिरॅमिकमध्ये खूप आकर्षक रंगामध्ये, डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे मग त्यांच्याकडे बघूनच ते विकत घेण्याचा मोह होतो आणि आपण ते मोठ्या हौशीने घरी आणतो. त्याची पुरेपूर काळजी घेतली, ते नाजूकपणे हाताळले तरी एखाद्या दिवशी जे व्हायचं तेच होतं आणि ती वस्तू फुटते. तिचे तुकडे होतात. तसं झालं की आपला जीव हळहळतो आणि आपण ते उचलून सरळ कचऱ्याच्या पिशवीत टाकून देतो (how to join broken ceramic planters or show pieces?). पण इथून पुढे असं करू नका. कारण तुटलेल्या सिरॅमिकच्या वस्तूसुद्धा खूप चांगल्याप्रकारे जोडून पुन्हा वापरता येतात.(simple hacks for fixing broken coffee mug or ceramic planters)

 

सिरॅमिकच्या तुटलेल्या वस्तू पुन्हा कशा जोडायच्या

१. हॉट ग्लू

स्टेशनरीच्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला कुठेही हॉट ग्लू मिळेल. सिरॅमिकच्या वस्तू चिटकविण्यासाठी त्याचा खूप चांगला वापर होतात. जर तुमच्या वस्तूला मोठा तडा गेला असेल तर हा पर्याय त्या वस्तू जोडण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

सकाळी उठताना 'ही' चूक करणं पडेल महागात! बीपी वाढून तब्येत बिघडण्याचा धोका- तज्ज्ञ सांगतात...

जिथे ग्लू लावणार आहात ती जागा आधी एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर दोन्ही तुकड्यांना ग्लू लावा आणि ते एकमेकांना जोडा. जोडल्यानंतर एखादा मिनिट तरी त्यावर पक्का दाब द्या. जेणेकरून ते अगदी घट्ट चिटकतील. त्यानंतर साधारण एखादा दिवस तरी ती वस्तू तशीच अलगद ठेवा. तिला हाताळणं टाळा. त्यानंतर मग ती वापरायला काढा. इतकी व्यवस्थित जोडली जाईल की जोड कुठे दिला होता, ते लक्षातही येणार नाही.

 

२. फेव्हीस्टीक

बाजारात फक्त ५ रुपयांत मिळणारं फेव्हीस्टीक तुमच्या तुटलेल्या सिरॅमिकच्या वस्तू जोडण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं.

मेहेंदीमुळे लाल होणारे केस आवडत नाही? दिवाळीसाठी 'या' पद्धतीने मेहेंदी लावा- केसांना मिळेल नॅचरल शेड 

कपा किंवा एखादा छोटा पार्ट जर तुटला असेल तर हा पर्याय उत्तम आहे. छोट्या छोट्या वस्तू अतिशय व्यवस्थित जोडल्या जातात. शिवाय हॉट ग्लू घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. 

 

टॅग्स :होम रेमेडीकिचन टिप्ससोशल व्हायरल