साप (Snake) एक असा जीव आहे. ज्याची भारतीय संस्कृतीमध्ये पूजा देखिल केली जाते हिंदू धर्मात देवतेसमान मानले जाते. पण विषारी प्रमाणाचा उल्लेख जरी केला तरी भितीने धरकाप होतो. सापाशी सामना करणं काही सोपं काम नाही. (How To Keep Away Snake) घरात किंवा मंदीरात इतरत्र कुठेही साप दिसले तरी लोकांमध्ये भितीचं वातावरण दिसून येतं. (Tips & Tricks What Smells Do Snakes Hate These 5 Smell)
एक्सपर्ट्सच्यामते काही पदार्थांना असा गंध असतो जे साप अजिबात सहन करू शकत नाहीत असे पदार्थ ठेवून तुम्ही सापांना दूर पळवू शकता. पर्वतांच्या भागात किंवा पार्क असलेल्या ठिकाणी सापं येतात. सापांना बघताच भिती वाटते लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात सापासारखे विषारी प्राणी जास्त प्रमाणात घरात येतात. सापांना दूर पळवण्याचे काही सोपे उपाय पाहूया.
1) लसूण आणि कांदा हे २ पदार्थ असे आहे जे प्रत्येक घरांत असतात. सापांना या दोन पदार्थांचा गंध अजिबात सहन होत नाही. सापांना पुदिना आणि तुळशीच्या रोपातून निघणारा वासही अजिबात आवडत नाही. याच कारणामुळे भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोप लावलं जातं.
2) याव्यतिरिक्त लिंबाचा रस, व्हिनेगर, दालचिनीचे तेल मिसळून याचा स्प्रे तयार करा. यामुळे साप येण्याचे चान्सेस कमी होतात. गरम किंवा पेपरमिंट तेलात मिसळल्यास ते सापांना दूर पळवण्यासाठी प्रभावी ठरते. एका काचेच्या बाटतलीत मिसळून घराच्या अंगणात लावा. ज्यामुळे साप पळण्यास मदत होईल.
३) लवंग आणि दालचिनी सापांना दूर पळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. सापांना दूर पळवण्यासाठी तुम्ही लवंग आणि दालचिनीचा वापर करू शकता. तेलात मिक्स करून त्यावर स्प्रे करा. हा उपाय करताना सावधगिरी बाळगा, लक्ष ठेवा की सापाच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर उभं राहू नका.
पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन
४) व्हिनेगर सापांना दूर पळवण्याचा एक उत्तम उपाय आहे. सापांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही तलाव किंवा पूलांच्या किनारी सामान्य व्हाईट व्हिनेगर घालू शकता.
५) सापांना घरापासून लांब ठेवण्यासाठी एक लांब दांड्याचा वापर करा. साप त्यावर चढतील. सावधगिरीने हा दांडा उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवा. घरात अचानक साप शिरल्यास घाबरून न जाता जवळपासच्या सर्पमित्राची मदत घ्या.