Lokmat Sakhi >Social Viral > बाळाला बाटलीनं दूध पाजताय? बाळासाठी घातक ठरते दुधाची बाटली; पाहा ५ गंभीर धोके

बाळाला बाटलीनं दूध पाजताय? बाळासाठी घातक ठरते दुधाची बाटली; पाहा ५ गंभीर धोके

How To Keep Baby Milk Bottles Clean: सोय म्हणून बाळाला बाटलीची सवय लावली, पण बाटलीनं होणाऱ्या आजारांचं काय?(home remedies to remove milky odour from baby milk bottles)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 09:10 AM2024-11-06T09:10:04+5:302024-11-06T16:19:58+5:30

How To Keep Baby Milk Bottles Clean: सोय म्हणून बाळाला बाटलीची सवय लावली, पण बाटलीनं होणाऱ्या आजारांचं काय?(home remedies to remove milky odour from baby milk bottles)

how to keep baby milk bottles clean, home remedies to remove milky musty odour from baby milk bottles | बाळाला बाटलीनं दूध पाजताय? बाळासाठी घातक ठरते दुधाची बाटली; पाहा ५ गंभीर धोके

बाळाला बाटलीनं दूध पाजताय? बाळासाठी घातक ठरते दुधाची बाटली; पाहा ५ गंभीर धोके

Highlightsबाटली धुतल्यानंतर ती आतून पुर्णपणे वाळेल याची काळजी घ्या. ओलसर बाटलीमध्ये कधीच पुन्हा दूध ओतून बाळाला देऊ नका.

दूधाची बाटली बाळासाठी वापरुच नये, ते बाळासाठी अत्यंत घातक असतं. केवळ पालकांच्या सोयीसाठी आणि पूर्वी बाटलीने दूध पाजत म्हणून आताही पाजावे असं काहींना वाटतं मात्र बाळाला बाटलीची सवय लावूच नये. आणि आता लावली गेलीच असेल तर स्वच्छतेची चोख काळजी घ्यावी. नाहीतर बाळ सतत आजारी असू शकते, जुलाब होतात. मूल कुपोषित राहते. आईसाठी बाळाला बाटलीमध्ये दूध देऊन टाकणं सोपं असलं तरी बाटल्या धुण्याची प्रक्रिया मात्र खूप त्रासदायक ठरते. कारण ती बाटली वेळच्यावेळी योग्य पद्धतीने स्वच्छ झाली नाही तर बाटलीला दुधाचा कुबट वास  येऊ लागतो. यामुळे बाळांना बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन होण्याची भीतीही नाकारता येत नाही (how to keep baby milk bottle clean?). म्हणूनच मुलांचं आजारपण टाळण्यासाठी दुधाची बाटली योग्य पद्धतीने कशी स्वच्छ करायची ते पाहा..(home remedies to remove milky odour from baby milk bottles)

लहान मुलांची दुधाची बाटली कशी स्वच्छ करावी?

 

१. लगेच स्वच्छ करा

लहान मुलांची दुधाची बाटली नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे वेळच्यावेळी बाटली धुवून स्वच्छ करा. बाटलीतलं दूध मुलांनी संपवलं की लगेच ती उघडून गरम पाणी टाकून स्वच्छ करून घ्या. यामुळे तुम्हाला तुमच्या कामातून थोडा वेळ काढावा लागतो पण बाटली मात्र कमी मेहनतीत आणि कमी वेळात अगदी स्वच्छ होते. 

प्रत्येक धुण्यात कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? २ पदार्थ वापरून धुवा- जुने झाले तरी रंग उडणार नाही

२. ब्रशचा वापर करा

बऱ्याच जणींना असं वाटतं की पाणी टाकून बाटली अगदी खळखळ करून हलवली की ती स्वच्छ होते. पण तसं नसतं. दुधाचा चिकटपणा बाटलीमध्ये तसाच राहातो. त्यामुळे अगदी रोजच्यारोज बाटली ब्रश वापरून स्वच्छ करायलाच पाहिजे. त्यामुळे बाळाला त्यापासून बॅक्टेरियल संसर्ग होण्याचा धोका बहुतांश प्रमाणात कमी होतो.

 

३.  बाटली पुर्णपणे वाळू द्या

बाटली धुतल्यानंतर ती आतून पुर्णपणे वाळेल याची काळजी घ्या. ओलसर बाटलीमध्ये कधीच पुन्हा दूध ओतून बाळाला देऊ नका. बाटली पुर्णपणे वाळलेली असली तरी तिच्यात दूध घालण्यापुर्वी ती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने खळबळून घ्या आणि मगच त्यात दूध घालून बाळाला द्या.

कोण म्हणतं पिझ्झा करायला वेळ लागतो? घ्या ५ मिनिटांत होणाऱ्या चवदार पिझ्झाची खास रेसिपी

४. बाटलीची जागा

धुतलेली बाटली कधीही अंधाऱ्या ठिकाणी, एखाद्या कपाटात ठेवून देऊ नका. ती नेहमी स्वच्छ सुर्यप्रकाशात ठेवा आणि व्यवस्थित वाळू द्या. बाटली ज्या ठिकाणी ठेवली आहे तिथे पाल, झुरळं, मुंग्या फिरणार नाहीत, याची काळजी घ्या.

फक्त १ बीटरुट घेऊन करा 'हा' उपाय, केस गळणं बंद होऊन काही दिवसांतच दाट- लांबसडक होतील

५. स्टरलाईज करा

दर तीन- चार दिवसांतून एकदा बाटली स्टरलायझरमध्ये टाकून स्वच्छ करा. स्टरलायझर नसेल तर घरच्याघरी एखाद्या मोठ्या पातेल्यात गरम पाणी करा आणि त्या पाण्यात काही मिनिटांसाठी बाटली भिजत ठेवून ती स्टरलाईज करून घ्या. 

 

Web Title: how to keep baby milk bottles clean, home remedies to remove milky musty odour from baby milk bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.