कमीतकमी पैशात भरपूर पोषण देणारं फळ म्हणजे केळी. गरिबांचं सुपरफुड म्हणूनही केळ ओळखलं जातं. त्यामुळे आपण हे सुपरफूड अगदी हौशीने डझनभर घरी घेऊन येतो. पण बहुतांश लोकांना हाच अनुभव येतो की एक डझन केळी आणली तर त्यातली दोन- तीन केळी तरी १- २ दिवसांत खराब झाली, काळी पडली म्हणून टाकून द्यावी लागतात (How To Keep Banana Fresh For Long?). तुमच्या घरीही असंच होत असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा.. (simple tips and tricks for the storage of banana)
केळी जास्त दिवस टिकण्यासाठी उपाय
केळी जास्तीतजास्त दिवस टिकावीत, काळी पडू नयेत आणि अगदी फ्रेश राहावी यासाठी काय उपाय करावा याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.
आईबाबांनी मुलांसमोर कधीच मारु नयेत ‘या’ गप्पा, मुलांचा आत्मविश्वास जातो-होतात चिडकी
यामध्ये त्या सांगतात की केळी जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी अल्युमिनियम फॉईलचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो. यासाठी एक अल्युमिनियम फॉईल घ्या आणि ते केळीच्या देठाला व्यवस्थित गुंडाळा. रबर किंवा दोरा लावून ते पॅक करा. जेणेकरून केळीच्या देठांचा हवेशी संपर्क येणार नाही. हवेशी संपर्क होऊन त्यांची रासायनिक क्रिया झाली नाही तर केळी अधिक काळ टिकण्यास मदत होते.
ॲल्युमिनियम फॉइल घरात नसतील तर स्वयंपाक घरातले पेपर नॅपकिन्स वापरूनही तुम्ही हा उपाय करू शकता.
सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!
पेपर नॅपकिन्स आधी थोडे ओलसर करावे आणि नंंतर ते केळीच्या देठाला व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. त्यामुळेही केळी जास्तीतजास्त दिवस टिकून राहण्यास मदत होईल. काळी पडून ती खराब होणार नाहीत.