रंगीबेरंगी ड्रेस घालायला अनेकांना आवडते (Cleaning Tips). पण बरेच जण पांढरा आणि काळ्या रंगाचा ड्रेस आवर्जून आणि आवडीने घालतात. काही महिलांना ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालायला आवडते (Clothing Tips). काळ्या रंगाच्या कपड्यांमधून आपल्याला वेगळाच लूक मिळतो. यात काही जण स्लिम देखील दिसतात. तुमच्या वॉर्डरोबमध्ये देखील काळ्या रंगाचे कपडे असतील.
परंतु, हेच आवडीचे ब्लॅक ड्रेस धुतल्यानंतर जुने दिसू लागतात. संपूर्ण ड्रेसची शोभा कमी होते. जर काळ्या रंगाच्या ड्रेसचा रंग फिका पडत असेल तर, ४ टिप्स फॉलो करून पाहा. काळ्या रंगाच्या कपड्यांचा रंग फिका पडणार नाही. शिवाय कायम नवे दिसतील(How to Keep Black & Dark-Colored Clothes From Fading).
काळ्या रंगाचे कपडे धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
मिठाचा वापर
काळ्या रंगाचे कपडे धुताना मिठाचा वापर करा. जर आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धूत असाल तर, त्यात डिटर्जंटसह अर्धा कप मीठ टाका. यानंतर त्यात काळे कपडे घालून धुवून घ्या. असे केल्याने रंग पक्का होईल. शिवाय धुतल्यानंतर फिका पडणार नाही.
जेवणानंतर पोट फुग्यासारखं टम्म फुगतं? न ५ गोष्टी खा, अपचनाचा त्रास होणारच नाही
व्हिनेगरचा वापर
मीठाप्रमाणेच व्हिनेगरच्या मदतीने आपण काळ्या रंगाचे कपडे धुवू शकता. यासाठी वॉशिंग मशिन किंवा बादलीमध्ये धुत असताना त्यात एक चतुर्थांश कप व्हिनेगर घालून मिक्स करा. त्या पाण्यात काळ्या रंगाचे कपडे घालून धुवून घ्या.
ड्रायरमध्ये सुकवू नका
काळ्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये सुकवू नका. यामुळे कपड्यांचा रंग खराब होऊ शकतो. त्याऐवजी सूर्यप्रकाशात वाळत घाला.
३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी आईबाबा आता शोधताहेत नवरा, लग्नाचं हे काय भलतंच प्रकरण?
थंड पाण्याने कपडे धुवा
काळ्या रंगाचे कपडे कोमट पाण्याचा वापर करून धुवू नका. यामुळे त्याचा रंग खराब होऊ शकतो. काळ्या रंगाचे कपडे नेहमी थंड पाण्यात धुवा.