Lokmat Sakhi >Social Viral > नवीन कपडे पहिल्यांदा धुताना रंग जातो? पाण्यात मिसळा ३ पदार्थ, रंग जाणार नाही...

नवीन कपडे पहिल्यांदा धुताना रंग जातो? पाण्यात मिसळा ३ पदार्थ, रंग जाणार नाही...

Tips to Prevent Clothes from Fading : Top Tips to Prevent Colors from Fading : कपड्याचा रंग गेला की ते खराब दिसतात, इतर कपड्यांना रंग लागतो तसं होऊ नये म्हणून उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 08:09 PM2024-07-27T20:09:14+5:302024-07-27T20:12:49+5:30

Tips to Prevent Clothes from Fading : Top Tips to Prevent Colors from Fading : कपड्याचा रंग गेला की ते खराब दिसतात, इतर कपड्यांना रंग लागतो तसं होऊ नये म्हणून उपाय...

How to keep colors from fading in the wash How to stop colours running in wash | नवीन कपडे पहिल्यांदा धुताना रंग जातो? पाण्यात मिसळा ३ पदार्थ, रंग जाणार नाही...

नवीन कपडे पहिल्यांदा धुताना रंग जातो? पाण्यात मिसळा ३ पदार्थ, रंग जाणार नाही...

बरेचदा आपण नवीन विकत आणलेले कपडे धुतल्याशिवाय वापरत नाही. यासाठीच कपडे नवीन आणल्यावर आपण ते आधी धुतो. काहीवेळा या नवीन कपड्यांच्या पहिल्याच धुण्यात रंग निघू लागतो. या नवीन कपड्यांचा पहिल्याच धुण्यात रंग निघू लागल्याने आपल्याला पैसे वाया गेल्याचं आणखीनच वाईट वाटतं. या नवीन कपड्यांचा रंग पहिल्या धुलाईत जाऊन तो कपडा रंग गेल्यामुळे फिका वाटू लागतो( How to stop colours running in wash).

नवीन कपड्याचा रंग फिका झाल्याने ते नवीन कपडे नवीन राहत नाही. असे नवीन कपडे रंग गेल्यामुळे लगेच जुने दिसू लागतात. या नवीन कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून आपण अनेक टिप्सचा वापर तर करतोच, सोबतच हे कपडे धुण्यासाठी अनेक गोष्टींचा आणि वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करुन पहातो. परंतु काही केल्या या कपड्यांचा रंग हा जातोच. असे होऊ नये म्हणून काही ट्रिक्सचा वापर केल्यास कपड्यांचा रंगही जात नाही आणि तुम्ही वर्षानुवर्ष ते कपडे वापरू शकता, जे नव्या सारखेच दिसतील. नवीन कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून काही खास टिप्स समजून घेऊयात(Top Tips to Prevent Colors from Fading). 

पहिल्याच धुण्यात कपड्यांमधून जास्त रंग निघत असल्यास काय करावे ?

१. पहिल्यांदा धुताना जर कपड्यांचा रंग जास्त प्रमाणात जात असेल तर असे कपडे जास्त वेळ पाण्यांत ठेवू नका. 

२. गरम पाण्यात कपडे कधीही धुवू नका, कारण यामुळे कपड्यांचा रंग जास्त फिका होतो.

३. ज्या कपड्यांमधून वारंवार जास्त प्रमाणात रंग निघतो असे कपडे आधी पाण्यात भिजवण्याऐवजी थेट धुवा आणि ते सुकण्यासाठी वाळत घाला. 

४. कपड्यांवर साबण लावल्यानंतर तुम्ही ते थंड पाण्यात धुवू शकता, यामुळे कपड्यांचा रंग कमी प्रमाणात जातो. 

पावसाळ्यात पायमोज्यांना येणाऱ्या भयंकर दुर्गंधीचं काय करायचं? हे घ्या ३ उपाय, मोजे राहतील स्वच्छ...

कपड्यांचा रंग निघत असेल तर... 

१. कपड्यांचा रंग निघत असेल तर असे कपडे तुम्ही थोड्या वेळासाठी व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवू शकता. यासाठी अर्धी बादली पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून व्हिनेगर घालावे. या पाणी व व्हिनेगरच्या द्रावणात कपडे १० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर कपडे थेट धुवून वाळत घालावेत. यामुळे कपड्यांचा रंग जाणार नाही. 

२. पाण्यात एक चमचा मीठ मिसळा आणि त्यात हे कपडे काही तास भिजवा. मीठ रंग स्थिर ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे कपड्यांचा रंग जाण्याची शक्यता कमी होते.

३. एका टबमध्ये थंड पाणी घ्यावे. त्यामध्ये ७ ते ८ चमचे मीठ आणि ५ चमचे बारीक केलेली तुरटी किंवा तुरटीची पावडर घालावी. हे सर्व पाण्यात नीट मिक्स होऊ द्यावे. नंतर या पाण्यात कपडे भिजवावे आणि तासभर तसेच राहू द्यावेत. त्यानंतर साध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुवून घ्यावेत.  

लादी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन त्यातून कुबट दुर्गंधी येते ? १ सोपी ट्रिक, कष्ट न घेताच मॉप होईल स्वच्छ.. 

या गोष्टी लक्षात ठेवा... 

१. रंग जाणारे कपडे धुताना तुम्ही ते इतर कपड्यांपासून वेगळे धुवा नाहीतर कपड्यांचा रंग इतर कपड्यांना लागेल. 
२. वॉशिंग मशीनमध्ये रंगीत कपडे धुवू नका कारण यामुळे कपड्यांचा अधिक रंग निघून जाईल.
३. गडद रंगाच्या कपड्यांपासून हलक्या रंगाचे कपडे वेगळे धुवा.
 

Web Title: How to keep colors from fading in the wash How to stop colours running in wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.