Lokmat Sakhi >Social Viral > फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश

फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश

How To Keep Flowers In Flower Pot Fresh For Long: फ्लाॅवरपॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी हा एक खास उपाय करून पाहा... (home remedies to keep flowers in vase fresh for long)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 01:24 PM2024-07-22T13:24:22+5:302024-07-22T17:12:36+5:30

How To Keep Flowers In Flower Pot Fresh For Long: फ्लाॅवरपॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी हा एक खास उपाय करून पाहा... (home remedies to keep flowers in vase fresh for long)

how to keep flowers in flower pot fresh for long, home remedies to keep flowers in vase fresh for long | फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश

फ्लॉवरपॉटमधली फुलं एक-दोन दिवसांत सुकतात? पाण्यात 'हा' खास पदार्थ घाला, फुलं राहतील फ्रेश

Highlightsफ्लॉवर पॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काय उपाय करावा?

कोणत्या ना कोणत्या निमित्ताने फुलांचे गुच्छ घरात येत असतात. किंवा कधी कधी आपल्याला काही फुलं आवडतात आणि आपण ती हौशीने घरी घेऊन येतो. कधी कधी बागेतली फुलं तोडून ती सजविण्याचा मोह देखील होतोच. अशावेळी आपण अगदी वेळात वेळ काढून फ्लॉवरपॉट सजवतो. पण नेमकं होतं असं की इतकी मन लावून सजविलेली फुलं अगदी एका दिवसांतच कोमेजून जातात (how to keep flowers in flower pot fresh for long). तुम्ही फ्लॉवरपॉटमध्ये एवढी मनापासून केलेली फुलांची रचना अगदी आठवडाभर जशास तशी ठेवायची असेल आणि शिवाय फुलांचा सुगंधही कायम ठेवायचा असेल तर हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा... (home remedies to keep flowers in vase fresh for long)

फ्लॉवरपॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी उपाय

 

फ्लॉवर पॉटमधली फुलं जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नेहमीच तरुण राहायचं- सुंदर दिसायचं? ५ सवयी लावून घ्या, वय वाढलं तरी शरीर राहील फिट

सगळ्यात आधी फुलांच्या देठांना तिरका छेद देऊन घ्या. त्यानंतर फ्लॉवर पॉटमध्ये पाणी टाका. आणि त्यासोबत थोडंसं स्प्राईट टाका. स्प्राईटमध्ये असणारी साखर आणि इतर काही घटक फुलं फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतील. पाणी आणि स्प्राईट यांचं प्रमाण ३:१ या प्रमाणात असावं.

 

हा उपायही बघा... 

दरवेळी स्प्राईट आपल्या घरात असेलच असं काही नाही. शिवाय दरवेळी फुलं ताजी ठेवण्यासाठी स्प्राईट विकत घेणंही शक्य नसतं. अशावेळी घरगुती साहित्य वापरून फ्लॉवरपॉटमधली फुलं अधिक काळ ताजी कशी ठेवायची ते पाहूया...

यासाठी सगळ्यात आधी तर फुलांची देठं कापून घ्या. देठांचा अगदी एखादा इंच भागच पाण्यात बुडेल एवढंच पाणी फ्लॉवरपॉटमध्ये टाका.

'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

त्या पाण्यात १ चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ टाका. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलूवन घ्या. पाणी आणि मीठ पाण्यात पुर्णपणे विरघळलं की त्यात फुलं ठेवा. 

हे पाणी दर दोन दिवसांनी बदला. त्यावेळी देठांचा खालचा भाग पुन्हा एक ते दिड इंचाने कापून टाका. फुलं नक्कीच जास्त दिवस  फ्रेश राहतील. 

 

Web Title: how to keep flowers in flower pot fresh for long, home remedies to keep flowers in vase fresh for long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.