Join us  

घरात पाल दिसली की भीती वाटते? ३ उपाय, पाली आपल्या घरापासून राहतील लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 3:51 PM

Home Hacks: घरात पाल (lizards) दिसली की कसंतरीच होतं. तिची खूपच भीती वाटते. म्हणूनच तर पालीला आपल्या घरापासून लांब ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा. (How to keep lizard away from home?)

ठळक मुद्देपालीला घरातून बाहेर काढण्यासाठी यावेळी हे ३ उपाय करून बघा. 

पालीची भीती वाटणाऱ्या खूप जणी आहेत. जेव्हा घरात कुणी नसतं आणि अचानक वरच्या किंवा समोरच्या भिंतीवर पाल दिसते तेव्हा तर भितीने उडणारी गाळण विचारायलाच नको. असंही बऱ्याचदा होतं की आपण रात्री झोपलेलो असतो. अचानक वर नजर जाते आणि वरच्या भिंतीवर आपल्या डोक्याच्या अगदी वर पाल दिसते. अशावेळी ती पाल अंगावर, अंथरुणावर पडेल का याची जाम भीती वाटत राहते. त्यामुळे पालीला घराबाहेर काढण्यासाठी अनेक जणी अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण पाल काही आपलं घर सोडत नाही. म्हणूनच तर पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी यावेळी हे ३ उपाय (3 natural remedies to get rid of lizards at home) करून बघा. 

 

घरात पाली येऊ नयेत म्हणून उपाय..१. मिरेपूडचं पाणीमिरे थोडे भाजून घ्या. थंड झाले की ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. जेवढी पावडर असेल, त्याच्या दुप्पट पाणी त्यात घाला

महागडं केशर विकत आणलं पण ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? ३ सोपे उपाय, ओळखा केशरातली भेसळ

आणि हा स्प्रे पाल जिथून आपल्या घरात येते अशा भिंतींवर, खिडकीच्या काचेवर मारा. जेणेकरून त्या ठिकाणाहून पाल आपल्या घरात येणार नाही.

 

२. डांबराच्या गोळ्याडांबराच्या गोळ्या कपाटावर, बेडच्या खाली, खिडकीमध्ये, दरवाज्याच्या चौकटींवर अशा प्रत्येक ठिकाणी ठेवा, जिथे तुमच्या घरात पालीचा वावर सर्वाधिक असतो. आपल्या घरात पालीची काही मोजकी ठिकाणं असतात, जिथे हमखास पाल असते, अशा  सगळ्याच ठिकाणी डांबराच्या गोळ्या ठेवा. गोळ्यांच्या वासाने पाल घरात फिरकणार नाही. 

 

३. कांद्याचा रसकांदा किसून त्याचा रस तयार करा आणि हा रस एका स्प्रे बॉटरमध्ये भरा.

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : चवदार, सुगंधी दूध मसाला तयार करण्याची खास रेसिपी, विकतचा मसाला आणणं विसरून जाल

कांद्याचं पाणी पाल खिडकी, दरवाजे, घरातले कोपरे यांच्यावर तसेच पाल जिथे जास्त असते अशा ठिकाणी मारा. दर दोन दिवसांनी हा उपाय करा. कांद्याच्या उग्र वासाने पाल घरात येणार नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स