फ्लॅटमध्ये राहणारे लोक कबुतरांनी त्राससेले असतात. घराच्या बाल्कनीपासून ते छतापर्यंत सगळीकडे कबुतरं येतात. कबुतरांच्या आवाजामुळे अनेकांना त्रास होतो. (Home Hacks) कितीही पळवून लावलं तरी कबुतरं पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतात. आडोश्यासाठी जागा मिळतात कबुतरं बाल्कनीत हळूहळू काड्या, झाडांची पानं, चारा आणायला सुरूवात करा आणि घरटं तयार करून अंडी देतात. (How To Keep Pigeons Away Balcony Rooftop)
एकदा त्यांनी घरटं तयार केलं तर ते बाहेर निघतच नाहीत. त्यात कबुतरांच्या विष्ठेच्या घाण वासानं अनेकांना एलर्जी होते. हा वास बाल्कनीतून संपूर्ण घरात परसतो. कबुतरांच्या अंड्यातून पिल्ल बाहेर आल्यानंतर ते मोठे होईपर्यंत फेकताही येत नाही.... त्यानंतर कबुतरं पुन्हा अंडी घालतात. कबुतरांचा त्रास टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता (How To Keep Pigeons Away Balcony)
काळ्या मिरीची पावडर घाला
प्रॉपर्टी स्कॉटच्या रिपोर्टनुसार काळी मिरी पावडरचा सुगंध असा आहे जो कबुतरांना अजिबात आवडत नाही. म्हणून बरेच लोक ही ट्रिक वापरून कबुतरांना दूर ठेवतात. कबुतरं वारंवार ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ही पावडर शिंपडल्यास तीव्र वासानं कबुतरं पळून जातील. कबुतरं आत शिरू नयेत यासाठी नेट लावून घ्या.
काळ्या पिशवीचा वापर करा
बाल्कनीत कबुतरांचा आवाज जास्त असेल तर तुम्ही चमकदार काळी पिशवी घ्या. त्यात जुनी वर्तमानपत्र गोळा करून भरा. चुरगळून ठेवलेले पेपर थोड्या मोठ्या आकाराचे असावेत. तेव्हाच कबुतरांना पिशवी मोठी दिसेल. बाल्कनीच्या उंचावर ही पिशवी टांगून ठेवा. ज्या ठिकाणी ऊन येतं अशा ठिकाणी ठेवा. हे पाहून कबुतरं बाल्कनीत येणार नाहीत.
कॅक्टसचं रोप लावा
बाल्कनी सतत कबुतरं येत असतील तर तुम्ही कॅक्टसचं रोप लावू शकता. हे रोप अशा जागेवर लावा जिथे कबुतरं येऊन बसतात. या रोपामुळे कबुतरं येण्याचं प्रमाण कमी होईल.
बाल्कनीत निरूपयोगी सामान ठेवू नका
बाल्कनी किंवा छतावर तुम्ही निरूपयोगी सामान ठेवला तर त्या ठिकाणी कबुतरं येतील. बाल्कनी जास्तीत जास्त मोकळी ठेवा. कारण तुम्ही खोका, भांडी असं काही सामान ठेवलं तर कबुतरं त्या ठिकाणी चारा, काड्या आणून घरटं तयार करतील मग कबुतरांना पळवून लावणं कठीण होईल.
घरात पाळीव प्राणी पाळा
घरात पाळीव प्राणी असतील तर पक्ष्यांना दूर ठेवण्यास मदत होईल. कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी नैसर्गिक प्रबंधक म्हणून काम करतात. जरी ते पाळीव प्राणी असले तरी त्यांची शिकारी प्रवृत्ती असते. म्हणून त्यांना कोणतीही विशिष्ट आज्ञा न देता ते कबुतरांचा पाठलाग करतात. त्यांच्या या कृतीमुळे पक्ष्यांचा घरात वावर कमी होतो.