प्लास्टीकची खुर्ची सर्वांच्याच घरी असते. (Cleaning Hacks) गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाच्या घरी ही खुर्ची पाहायाल मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खुर्च्या फार महागही नसतात. उचलून अगदी कुठेही ठेवता येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या खुर्च्यांचा वापर करू शकतात. (How to Keep White Plastic Chairs Spotless And Clean) पण या खुर्च्या खराब झाल्यानंतर जुन्या दिसू लागतात. अशावेळी खुर्च्या नव्यासारख्या चमकदार दिसण्याासठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (How To Keep Plastic Chair New For A Year)How To Keep Plastic Chair New For A Year)
प्लास्टीकची खुर्ची नव्यासारखी दिसण्यासाठी काय करावे?
१) नियमित साफ करत राहा
प्लास्टीकची खुर्ची नियमित स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. यासाठी ही खुर्ची नियमित स्वच्छ करा. यासाठी एका नरम कापडाचा आणि हलक्या डिटर्जेंटचा वापर करू शकता. आठवड्यातून कमीत कमी एकदा हा उपाय नक्की करा. घरातील खुर्च्या खूप घाणेरड्या झाल्या असतील तर तुम्ही बेकींग सोडा किंवा पाणी वापरून याची पेस्ट बनवू शकता आणि खुर्च्यांवर लावू शकतात. नंतर पाण्याने धुवा किंवा कापडाने पुसून घ्या. ज्यामुळे खुर्च्या नव्यासारख्या दिसण्यास मदत होईल सतत स्वच्छ कराव्या लागणार नाहीत.
आंबे खाल्ल्याने शुगर वाढते का? आहारतज्ज्ञ सांगतात आंबे खाऊन वजन आणि शुगर नियंत्रणात कशी ठेवावी....
२) खुर्ची ऊन्हात ठेवू नका
प्लास्टीकच्या खुर्च्या थेट ऊन्हात ठेवू नये यामुळे खुर्चांचा रंग फिका पडू शकतो. इतकंच नाही सुर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे खुर्च्यांचा रंग फिकट होऊ शकतो. याव्यतिरिक्त प्लास्टीकच्या खुर्ची अत्याधिक गरम ठिकाणी ठेवू नका. प्लास्टीकच्या खुर्च्यांवर गरजेपेक्षा जास्त भार येऊन या तुटू शकतात.
पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल
३) खुर्च्यांना पेटींग करा
प्लास्टीकच्या खुर्च्यांना चांगले ठेवण्यासाठी तुम्ही पेटींग करू शकता. पेटींगच्या मदतीने खुर्चांना नव्यासारखा लूक येईल. प्लास्टीकच्या स्प्रेच्या मदतीने तुम्ही खुर्चांची हरवलेली चमक पुन्हा आणू शकता. ज्यामुळे धूळ, घाणीपासून बचाव होण्यास मदत होईल. हा एक चांगला पर्याय असू शकतो.
४) खुर्च्यांवर स्क्रॅचेच येणार नाही याची काळजी घ्या
प्लास्टीकच्या चेअरची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे खुर्चा खराब होतात. अशा स्थितीततुम्ही प्लास्टीकच्या खुर्च्या साफ करत असाल तर जास्त रगडू नका. यामुळे खुर्च्यांवर स्क्रॅचेच येतात जे दिसायला अजिबात चांगले दिसत नाही.