Lokmat Sakhi >Social Viral > ना रुम हिटरची गरज ना शेकोटीची, ५ ट्रिक्स-थंडीतही घर राहील उबदार-विजेचीही होईल बचत...

ना रुम हिटरची गरज ना शेकोटीची, ५ ट्रिक्स-थंडीतही घर राहील उबदार-विजेचीही होईल बचत...

How To Keep Warm Room Without Heater Know 5 Useful Hacks : 5 Hacks to Warm Up Your Room Without a Heater : How to Make Your House Warmer Without Heater In Winters : हिवाळ्यात रुम उबदार ठेवण्यासाठी वापरा या ५ सोप्या ट्रिक्स, कडाक्याच्या थंडीतही मिळेल कमालीचा उबदारपणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 05:44 PM2024-11-15T17:44:28+5:302024-11-15T17:58:44+5:30

How To Keep Warm Room Without Heater Know 5 Useful Hacks : 5 Hacks to Warm Up Your Room Without a Heater : How to Make Your House Warmer Without Heater In Winters : हिवाळ्यात रुम उबदार ठेवण्यासाठी वापरा या ५ सोप्या ट्रिक्स, कडाक्याच्या थंडीतही मिळेल कमालीचा उबदारपणा...

How To Keep Warm Room Without Heater Know 5 Useful Hacks 5 Hacks to Warm Up Your Room Without a Heater How to Make Your House Warmer Without Heater In Winters | ना रुम हिटरची गरज ना शेकोटीची, ५ ट्रिक्स-थंडीतही घर राहील उबदार-विजेचीही होईल बचत...

ना रुम हिटरची गरज ना शेकोटीची, ५ ट्रिक्स-थंडीतही घर राहील उबदार-विजेचीही होईल बचत...

सध्या थंडीच्या सिजनला सुरुवात झाली आहे. दिवसभर थंडी कमी असली तरी रात्री आणि पहाटे कुडकुडणारी थंडी पडते. थंडीत वातावरणातील गारठा वाढल्याने आपल्याला खूपच थंडी वाजू लागते. घराचे खिडक्या, दरवाजे उघडे असतील तर जास्तच थंडी लागते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण स्वेटर, शाल, चादरी, ब्लँकेट्स वापरतो. याचबरोबर, गारठ्याने थंड पडलेल्या बेडरुममध्ये उब यावी यासाठी शक्यतो बहुतेकजण हिटरचा वापर करतात. हिटर लावल्याने आपल्या बेडरुममध्ये उबदार वातावरण तयार होऊन आपल्याला कडाक्याच्या थंडीतही शांत झोप लागते(How To Keep Warm Room Without Heater Know 5 Useful Hacks).

थंडीच्या सिजनमध्ये थंडी पासून बचाव करण्यासाठी बहुतेकजण हिटर, गिझर, ब्लोअर अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करतात. थंडीतच अशा उपकरणांची फार मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. संपूर्ण हिवाळ्यात (5 Hacks to Warm Up Your Room Without a Heater) आपण या उपकरणांचा वापर करुन थंडीपासून स्वतःचे संरक्षण करतो. या उपकरणातून मिळणाऱ्या उष्णता आणि उबदारपणामुळे थंडी तर दूर पळते, परंतु यांचा सतत वापर केल्याने येणारा मोठा बिलाचा आकडा पाहून आपण थंडगार पडतो. यासाठी यंदाच्या हिवाळ्यात हिटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर न करता देखील आपण आपली बेडरुम कशी उबदार ठेवू शकतो ते पाहूयात(How to Make Your House Warmer Without Heater In Winters).

हिटर न वापरता खोली उबदार ठेवण्याचे सोपे उपाय... 

१. खिडक्या - दरवाजे करा कव्हर :- थंडीच्या दिवसांत घराच्या उघड्या खिडक्या - दरवाज्यातून भरपूर गार हवा आत येत असते. अशावेळी घराचे खिडक्या - दरवाजे कार्डबोर्ड किंवा थर्माकोलच्या मदतीने कव्हर करून घ्यावे. जेणेकरून खिडक्या - दरवाज्यातून गार हवा आत येणार नाही. 

ऐन थंडीत ब्लँकेट-चादरी-गोधड्या पडल्या गार? ३ ट्रिक्स, गारठा गायब-पांघरुण वाटेल उबदार...

२. वॉर्म लाईट्सचा करा वापर :- थंडीत गारठ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण रुममध्ये वॉर्म लाईट्स लावू शकता. वॉर्म लाईट्स सोबतच आपण मेणबत्त्यांच्या देखील वापर करु शकतो. यामुळे खोलीत एका प्रकारचा उबदारपणा कायम टिकून राहतो. 

३. जाड बेडशिट्सचा करा वापर :- थंडीच्या दिवसात आपण अंगावर घेण्यासाठी चादरी, ब्लँकेट्स, गोधड्या कपाटातून काढतो. मात्र बेडवर पातळ कॉटनची चादर अंथरतो, अशा पातळ चादरीवर झोपल्यास अधिक जास्त थंडी लागते. यासाठी बेडवर देखील जाड आणि उबदार बेडशीट्स अंथराव्यात ज्यामुळे आपल्याला झोपताना उबदारपणा जाणवेल. 

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी पडते? ‘या’ ३ चुका तुम्ही हमखास करताय...

४. फरशीवर उबदार मॅट अंथरा :- हिवाळ्यात बहुतेकवेळा फरशी देखील थंडीने गार पडते. अशा थंड फरशीवर पाय ठेवावासा वाटत नाही. यासाठी फरशीवर उबदार मॅटस अंथराव्यात. जेणेकरुन फरशीवरून चालताना किंवा बसल्यावर गारवा लागणार नाही. 

५. जाड पडद्यांचा वापर करा :- थंडीत खिडक्या - दरवाज्यातून भरपूर प्रमाणात वारा घरात आत येतो. यामुळे रुम गार पडून थंडी लागते. यासाठी खिडक्या - दरवाजे कव्हर करण्यासाठी जाड पडद्यांचा वापर करा. जेणेकरुन वारा आत येणार नाही.

Web Title: How To Keep Warm Room Without Heater Know 5 Useful Hacks 5 Hacks to Warm Up Your Room Without a Heater How to Make Your House Warmer Without Heater In Winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.