उन्हाळ्यात हंडा, कळशी, बॉटल किंवा फिल्टरमदगे असलेलं पाणी आपोपाप कोमट होते. अशा वेळी कोमट पाण्याने तहान शमवणे कठीण होऊन जाते. फ्रिजमधलं थंड पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचं म्हणण्यात येते. शिवाय फ्रिजमधलं थंड पाणी प्यायल्याने वजन देखील वाढते (Summer Special). काही घरात फ्रिजचं पाणी पिण्याऐवजी मडक्यातील थंड पाणी पितात.
माठातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण बऱ्याचदा मडक्यातील पाणी लवकर खारब होते किंवा त्यातून कुबट वास येतो (Matka Water). मडक्यात अधिक वेळ पाणी फ्रेश राहावे यासाठी आपण काही टिप्स फॉलो करू शकता. या टिप्समुळे मडक्यात पाणी अधिक काळ फ्रेश राहील (Health Care). मडक्यात पाणी स्टोर करताना कोणती काळजी घ्यावी पाहूयात(How to keep Water Cool in Matka).
मातीची मदत घ्या
मडक्यातील पाणी फ्रेश आणि थंड राहावे यासाठी आपण मातीची मदत घेऊ शकता. यासाठी बागेत मडक्याच्या मापाचा खड्डा तयार करा. त्या खड्डयामध्ये अर्धे मडके आत घालून ठेवा. मडक्याचा अर्धा भाग पाण्याने भरून ठेवा. नंतर सर्व बाजूनी मातीने कव्हर करा, आणि मडक्याला झाकण लावा. १० ते १५ मिनिटात नैसर्गिकरित्या पाणी थंड होईल. हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत
वाळूचा वापर करा
मडके मातीत ठेवायचं असेल तर, आपण वाळूचा देखील वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात वाळू भरून ठेवा. त्या वाळूवर मडके ठेवा. वाळूच्या थंडाव्यामुळे मडक्यातील पाणी थंड राहील. शिवाय मडके फुटणार नाही. मडक्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील होते. याव्यतिरिक्त आपण मडक्याला गोणीने कव्हर करू शकता. यामुळे देखील मडक्यातील पाणी थंड राहते.
वेळोवेळी मडके स्वच्छ करा
आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर..
ज्याप्रमाणे आपण फ्रीज साफ करण्याकडे लक्ष देतो, त्याचप्रमाणे मातीचे मडके देखील स्वच्छ करा. यासाठी दोन ते तीन आठवड्यानंतर मडक्यातील पाणी काढून टाका, नंतर पूर्णपणे मडके स्वच्छ करून घ्या. मडके स्वच्छ धुतल्यानंतर सूर्यप्रकाशात काही काळ ठेवा. जेणेकरून त्यातील विषारी घटक नष्ट होतील. यानंतरच मडक्याचा वापर करा.