Join us

फ्रिजच्या पाण्यासारखं थंड होईल माठातलं पाणी; माठात 'हा' पदार्थ घाला- पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 17:05 IST

How To Keep Water Cool in Matka In Summer : सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये माठातलं पाणी थंड करण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे.

आजकाल फ्रिज, रेफ्रिजरेटर सर्वांच्या घरी असते तरीसुद्धा लोक पाणी थंड करण्यासाठी माठाचा वापर करतात. (Home Hacks) ग्रामीण भागातच नाही तर शहरातही प्रत्येकाच्या घरात पाण्याचा माठ असतो माठातल्या पाण्याची खासियत अशी असते की याची चव गोड असतो. याशिवाय फायदेसुद्धा मिळतात.  रेफ्रिजरेटरची गरज न भासता तुम्ही काही सोपे उपाय करून माठातलं पाणी गार ठेवू शकता. (How To Keep Water Cool in Matka In Summer Viral Matka Pani Video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये माठातलं पाणी थंड करण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे.  जेव्हा माठ नवीन घ्याल तेव्हा नळाचा खालचा भाग व्यवस्थित धुवून घ्या. त्यात पाणी भरून एक चमचा मीठ घाला आणि रात्रीभर तसंच सोडून द्या. (How To Make Water Cool Without Fridge In Summer)

सकाळी मीठाच्या पाण्याने माठ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ शकता. आता पुन्हा साफ करून भरून टाका.  त्यात पुन्हा पाणी भरून माठ झाकून ठेवून द्या.   शेवटी या व्हिडीओमधील महिला तुरटीचा तुकडा फिरवताना दिसते.  तुरटीचा तुकडा पाण्यात बुडवून काढून घ्या. ज्यामुळे माठातलं पाणी थंड राहण्यास मदत होईल. जर तुम्ही नवीन माठ विकत घेत असाल तर तो माठ आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर  त्या माठात  २ ते ३ दिवस पाणी भरून  ठेवा.

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

या दिवसांत माठातलं पाणी पिऊ नका. फक्त पाणी ठेवा जेणेकरून गारवा येईल. त्यानंतर हे पाणी पुन्हा बाहेर काढून  घ्या. माठ स्वच्छ धुवून त्यात पिण्याचे पाणी भरा. त्यानंतर माठाच्या वरच्या बाजूला एक सुती कापड ओला करून माठावर गुंडाळा. ज्यामुळे माठ बाहेरील बाजूने थंड राहील याशिवाय माठातलं पाणी देखील गार राहील. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया