सिलिंग फॅन (Ceiling Fan) साफ करणं वाटतं तितकं सोपं काम नाही. (Home Hacks) सिलिंग फॅनची साफ-सफाई करायचं म्हटलं तर स्टूलवर कोण चढणार, नाकात धूळ जाणार असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. घराचे डिप क्लिनिंग करण्यासाठी तुम्ही पंख्याची साफ सफाई कशी करायची ते समजून घ्यायला हवं. फक्त १ रूपयांत पंखा कसा स्वच्छ करायचा ते समजून घेऊ. (How To Clean Ceiling Fan in Just One Rupees)
बेटर होम्स अॅण्ड गार्डन्सच्या रिपोर्टनुसार वापरात नसलेले उशीचे कव्हर वापरून तुम्ही पंखा सहज स्वच्छ करू शकता. तुमच्याघरी उंच किंवा व्हाॉल्टेड छत असल्यास पंखा साफ करण्यासाठी इतर उपकरणांची आवश्यकता असू शकते. ब्लेडपर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारीत डस्टरचा वापर करा. ज्यामुळे धुळ, घाण सहज साफ होईल. जर तुम्हाला खोलीभोवती धूळ जास्त पडलेली वाटत असेल तर जुन्या पत्र्याने किंवा कापडाने घाण स्वच्छ करा.
केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट
फॅन किंवा कोणतंही इलेक्ट्रिक उपकरणं स्वच्छ करण्याआधी सुरक्षिततेची काळजी घेणं फार महत्वाचे आहे. त्यासाठी फॅनचे बटन्स, मेन स्विच बंद आहे की नाही ते तपासून घ्या, उपकरणांना स्पर्श करण्यासाठी लाकडी, खुर्ची किंवा स्टूलचा वापर करा. हातात ग्लोव्हज घालायला विसरू नका.
काय आहे हा जादूई उपाय
सिलिंग फॅन साफ करण्यासाठी सगळ्यात आधी १ रूपयांत मिळणाऱ्या शॅम्पूचा वापर करा. याच्या मदतीनं तुम्ही सिलिंग फॅन स्वच्छ करणं खूपच सोपं होईल. यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही ना जास्त पैसे खर्च करावे लागतील. शॅम्पू, हलकं कोमट पाणी, एक स्वच्छ कापड, बादली किंवा मोठ्या भांड्याची आवश्यकता असेल.
नखांवर पांढरे डाग आले-अंगात कॅल्शियम कमी झालंय? ५ पदार्थ खा; भरपूर कॅल्शियम मिळेल
सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला १ रूपयांचा शॅम्पू घ्यावा लागेल. एक मग पाण्यात शॅम्पू घाला. नंतर पंख्याचं स्विच बंद करा. नंतर या शॅम्पूच्या पाण्यात एक स्वच्छ कापड बूडवून पिळून घ्या. नंतर ओल्या कापडानं पंख्याचे ब्लेड्स हळूहळू स्वच्छ करा. पंखा जास्त दबावाने स्वच्छ करण्याची काही गरज नाही. अन्यथा पंख्याचे ब्लेड्स खराब होऊ शकतात.