Lokmat Sakhi >Social Viral > न घासताही चमकतील तांब्याची भांडी; फक्त मिठाचा 'असा' सोपा उपाय करून पाहा, सेकंदात भांडी चमकतील

न घासताही चमकतील तांब्याची भांडी; फक्त मिठाचा 'असा' सोपा उपाय करून पाहा, सेकंदात भांडी चमकतील

How To Keep Your Copper Vessels Sparkly Clean : तांब्याची भांडी न घासताही होतील स्वच्छ; फक्त ही ट्रिक माहित करून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 08:08 PM2024-09-30T20:08:43+5:302024-09-30T20:10:16+5:30

How To Keep Your Copper Vessels Sparkly Clean : तांब्याची भांडी न घासताही होतील स्वच्छ; फक्त ही ट्रिक माहित करून घ्या..

How To Keep Your Copper Vessels Sparkly Clean | न घासताही चमकतील तांब्याची भांडी; फक्त मिठाचा 'असा' सोपा उपाय करून पाहा, सेकंदात भांडी चमकतील

न घासताही चमकतील तांब्याची भांडी; फक्त मिठाचा 'असा' सोपा उपाय करून पाहा, सेकंदात भांडी चमकतील

पितळ आणि तांब्याची भांडी प्रत्येक स्वयंपाकघरात असतात (Copper Vessel). यामुळे किचनची शोभा वाढते. शिवाय पितळ आणि तांब्याच्या प्लेट किंवा भांड्यात स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत (Cleaning Tips). पण तांब्याची भांडी लवकर काळी पडतात. तांब्याची भांडी घासताना बराच वेळही जातो.

तांब्याच्या भांडीचा काळेपणा सहसा लवकर निघतही नाही. शिवाय बराच वेळ त्याचा वापर न केल्यानेही काळपट पडतात. हवा आणि मॉईश्चरच्या संपर्कात आल्यामुळे तांब्यासारखे धातू आपली चमक कमी करतात. तांब्याची भांडी जर वारंवार काळी पडत असतील, शिवाय घासण्यात बरीच मेहनत घ्यावी लागत असेल तर, मीठ आणि व्हिनेगरचा असा वापर करून पाहा. काही मिनिटात न घासता भांडी स्वच्छ होतील(How To Keep Your Copper Vessels Sparkly Clean).

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य


मीठ

मुलींना घरात कोंडून घालण्यापेक्षा आईबाबांनी त्यांना शिकवायला हव्या ५ गोष्टी; मुलगी होईल खंबीर..

व्हिनेगर

'या' पद्धतीने करा तांब्याची भांडी स्वच्छ

- तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे मीठ घ्या. नंतर त्यात एक कप व्हिनेगर घाला.

मासिक पाळी येतच नाही दोन दोन महिने? जीवनशैलीत आजच करा ५ बदल; पीरियड्स येतील वेळेवर

- व्हिनेगर आणि मीठ एकत्र मिक्स करा. नंतर त्यात तांब्याची भांडी काही वेळासाठी ठेवा. काही वेळाने बाहेर काढा. अगदी काही सेकंदात न घासताही तांब्याच्या भांडी स्वच्छ होतील.

- आपण लिंबूसत्वाचा देखील वापर करू शकता. यासाठी पाण्यामध्ये लिंबूसत्व आणि मीठ घालून मिक्स करा. नंतर या पाण्यात भांडी काही वेळासाठी बुडवून ठेवा. नंतर भांडी बाहेर काढा. अगदी काही सेकंदात न घासता तांब्याची भांडी स्वच्छ होतील. 

Web Title: How To Keep Your Copper Vessels Sparkly Clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.