Lokmat Sakhi >Social Viral > घराच्या भींतींना ओल आली, बुरशी लागली? ३ टिप्स- बुरशी होईल कमी-घरातला कुबट वास होईल कमी

घराच्या भींतींना ओल आली, बुरशी लागली? ३ टिप्स- बुरशी होईल कमी-घरातला कुबट वास होईल कमी

How to Keep Your Home Clean & Dry in the Rainy Season : भिंतींना येणाऱ्या बुरशीपासून सुटका हवी असल्यास ३ घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 05:44 PM2024-07-15T17:44:55+5:302024-07-15T17:45:51+5:30

How to Keep Your Home Clean & Dry in the Rainy Season : भिंतींना येणाऱ्या बुरशीपासून सुटका हवी असल्यास ३ घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा

How to Keep Your Home Clean & Dry in the Rainy Season | घराच्या भींतींना ओल आली, बुरशी लागली? ३ टिप्स- बुरशी होईल कमी-घरातला कुबट वास होईल कमी

घराच्या भींतींना ओल आली, बुरशी लागली? ३ टिप्स- बुरशी होईल कमी-घरातला कुबट वास होईल कमी

पाऊस म्हटलं की. आपल्या डोळ्यासमोर येतं (Monsoon Season). कांदा भजी, हिरवळ आणि जुनी गाणी पावसाळ्यातील वातावरण हे हवं हवं वाटतं. पण पावसाळा या ऋतूचे काही तोटे देखील आहेत (Cleaning Tips). पावसाळ्यात भिंतीवर वाळवी किंवा ओलाव्यामुळे फंगस निर्माण होतात. फंगसमुळे भिंती अधिक खराब होतात. त्यात हानिकारक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे आपल्या आरोग्यावरही धोका निर्माण होऊ शकतो.

हे फंगस फक्त भिंतीवर नसून, फर्निचर, कपडे आणि इतर वस्तूंवर हळूहळू निर्माण होतात. बऱ्याचदा फंगसमुळे भिंतीची शोभा कमी होते. जर आपण देखील भिंतीवरच्या फंगसमुळे त्रस्त असाल तर, काही घरगुती उपायांना फॉलो करा. भिंती होतील स्वच्छ(How to Keep Your Home Clean & Dry in the Rainy Season).

सूर्यप्रकाश

पावसाळ्यात हवेत आद्रता असते. ज्यामुळे घरातील वस्तू आणि भिंती ओलसर होतात. अशा स्थितीत घरात हवा खेळती राहील, याची खात्री करून घ्या. पाऊस थांबल्यानंतर खिडक्या उघड्‌या ठेवा. सूर्यप्रकाशामुळे फंगस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. शिवाय या दिवसात भिंतीच्या जवळ कोणतीही वस्तू ठेऊ नका. कारण बुरशी प्रथम भिंतींवर तयार होतात.

इडल्या फसतात, मऊ-हलक्या होत नाही? परफेक्ट साऊथ इंडियन इडली करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

एक्झॉस्ट फॅन

घरात एक्झॉस्ट फॅन लावा. कोंडल्यामुळे घरात हवा खेळती राहत नाही. स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये जास्त आद्रता असते. म्हणून एक्झॉस्ट फॅनचा वापर करा. आंघोळीनंतर स्वयंपाकघरातील दरवाजे उघडे ठेवा. घरातील एसी किंवा बेसिनच्या पाईपला गळती होत असेल तर ती तातडीने दुरुस्त करा. खराब होऊ नये म्हणून मसाले आणि धान्य वेळोवेळी सूर्यप्रकाशात ठेवा. यामुळे घरात कुबट गंध पसरणार नाही.

व्हिनेगर

घरामध्ये बुरशीची वाढ होत असेल तर त्या ठिकाणी व्हिनेगर फवारावे . यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर भरा, स्प्रे करा. स्प्रे केल्यानंतर स्क्रब करा. २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ओल्या कापडाने पुसा. यामुळे भिंतीवरील बुरशी निघून जाईल.

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

बेकिंग सोडा

जर घरात व्हिनेगर उपलब्ध नसेल तर, आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एका स्प्रे बॉटलमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी घालून मिक्स करा. तयार स्प्रि भिंतीवर शिंपडा. स्क्रबरने भिंत घासून घ्या. ओल्या कापडाने भिंत पुसून घ्या. यामुळे भिंतीवरचे डागही निघतील.

Web Title: How to Keep Your Home Clean & Dry in the Rainy Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.