Lokmat Sakhi >Social Viral > एसी, पंखा न वापरता घर थंडगार राहील; ३ गोष्टी करा, घर कायम हवेशीर-फ्रेश राहील

एसी, पंखा न वापरता घर थंडगार राहील; ३ गोष्टी करा, घर कायम हवेशीर-फ्रेश राहील

How to Keep Your House Cool Without Ac or Fan (Summer Special Tips) : जर तुमच्या घरात क्रॉस व्हेंटिलेशनची फॅसिलिटी असेल तर याचा वापर नक्की करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:33 AM2024-03-14T11:33:33+5:302024-03-14T21:09:04+5:30

How to Keep Your House Cool Without Ac or Fan (Summer Special Tips) : जर तुमच्या घरात क्रॉस व्हेंटिलेशनची फॅसिलिटी असेल तर याचा वापर नक्की करा.

How to Keep Your House Cool Without Ac or Fan : Home Hacks Tips To Keep Your House Cool Without AC | एसी, पंखा न वापरता घर थंडगार राहील; ३ गोष्टी करा, घर कायम हवेशीर-फ्रेश राहील

एसी, पंखा न वापरता घर थंडगार राहील; ३ गोष्टी करा, घर कायम हवेशीर-फ्रेश राहील

ऊन्हाळ्याच्या दिवसात आपण सर्वचजण एअर कंडिशनर, कुलर किंवा इतर वस्तूंचा वापर करतो.  गरम हवा आणि रणरणत्या उन्हात एअर कंडिशनरची ठंड हवा खूपच चांगली वाटते. (Home Hacks) पण नेहमी एसी समोर बसण्याची सवय झाली तर त्याचे दुष्परिणामही उद्भवू शकतात. असे लोक अर्धा तासही एसीपासून लांब राहू शकत नाहीत. (Summer Special Tips)

ऊन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या गरमीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय केले तर घर थंड राहील आणि उष्णतेचा त्रासही होणार नाही.  (Tips To Keep Your House Cool Without AC) ज्यामुळे तुमची स्किन आणि आरोग्य दोन्ही चांगले राहील याशिवाय तुमचा बजेटही बिघडणार नाही. घर थंड ठेवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to Keep Your House Cool Without Ac or Fan)

नॅशनल रेन्युएबल एनर्जी लॅबोरेटरीच्या रिपोर्टनुसार जेव्हा ऊन्हाचे टायमिंग नसेल तेव्हा दारं, खिडक्या उघड्या ठेवा. जेणेकरून थंड हवा घरात येईल. हवा जाऊ देण्यासाठी १ लहान खिडकी असावी.  तुम्ही एक्जोस्ट फॅनही लावू शकता. ज्यामुळे घरातील उष्णता बाहरे पडेल.  छतावरील पंखे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तुम्ही काही वेळासाठी पंखे सुरू ठेवू शकता. 

1) घरातलं एक्स्ट्रा सामान बाहेर काढा

जर तुमच्या घरात एस्क्ट्रा सामान असेल तर ते आधी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. बेडरूडम कमीत कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे घर हवेशीर राहील आणि शुद्ध हवा आत येईल.  मोकळ्या जागेमुळे हवा खेळती राहील.

2) गोणपाट

घराच्या खिडक्यांना किंवा घराच्या बाहेरच्या बाजूला  तुम्ही गोणपाट लावू शकता. मार्केटमध्ये किंवा किराण्याच्या दुकानात तुम्हाला गोणपाट सहज मिळेल. जेव्हा हवा येईल तेव्हा थंड होऊन आत येईल. तुम्ही गोणपाटावर पाण्याचा स्प्रे  मारू शकता म्हणजे थंड हवा घरात येईल.

लाईटबील कमी येण्यासाठी ५ गोष्टी करा; उन्हाळ्यात पंखा-एसीचा वापर वाढला तरी बिल येईल कमी

3) क्रॉस व्हेंटिलेशन

जर तुमच्या घरात क्रॉस व्हेंटिलेशनची फॅसिलिटी असेल तर  याचा वापर नक्की करा. हवा आल्यामुळे घर आणि खोली थंड राहते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत घरातील खिडक्या दिवसभर उघड्या ठेवा. जर खूपच ऊन घरात येत असेल अशावेळी खिडक्या बंद करा.

४) घराबाहेर शेड्स लावा

शेड्समुळे ऊन्हापासून बचाव होतो. तुम्ही थेट उन्हाच्या संपर्कात येत नाहीत.  ज्यामुळे खोल्या थंड राहण्यात मदत होते. ज्यामुळे उष्णता ६५ टक्के कमी जाणवते. तुम्ही आतल्या बाजूनेही खिडक्यांना कापडाचे शेड्स लावू शकता.

लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

5) बाल्कनी किंवा घराबाहेर झाडं लावा

 घरात मोकळी जागा असेल किंवा घराबाहेर थोडी जागा असेल तर तिथे तुम्ही मनी प्लांट, फुलं झाडं, तुळस, अशी झाडं ठेवू  शकता. ज्यामुळे घर सुशोभित दिसेल आणि मोकळी जागासुद्धा राहील. घरात थंडावा येण्यासाठी झाडं फायदेशीर ठरतात. ज्यामुळे हवासु्द्धा शुद्ध राहते आणि सकारात्मक वातावरण राहतं.

Web Title: How to Keep Your House Cool Without Ac or Fan : Home Hacks Tips To Keep Your House Cool Without AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.