Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

How to Keep Your Kitchen Clean & Dry in the Rainy Season : पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित... हवेतील आर्द्रता आणि ओलाव्याचा त्रास जाणवणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 06:08 PM2023-06-17T18:08:06+5:302023-08-02T14:47:23+5:30

How to Keep Your Kitchen Clean & Dry in the Rainy Season : पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित... हवेतील आर्द्रता आणि ओलाव्याचा त्रास जाणवणार नाही...

HOW TO KEEP YOUR KITCHEN CLEAN DURING THE MONSOON SEASON | पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

पावसाळा हा असा ऋतू आहे की या काळात वातावरणात ओलावा आणि आर्द्रता जास्त असते. हवेत सारखाच एक प्रकारचा दमटपणा असल्यामुळे घर आणि किचन कितीही वेळा पुसून स्वच्छ केले तरीही एक प्रकारचे दमट वातावरण घरात राहतेच. घर आणि स्वयंपाकघर कितीही स्वच्छ केले तरी घाण होतेच. पावसाचे पाणी आणि धूळ आल्याने स्वयंपाकघरात घाण येते, तसेच या महिन्यात ओलावा असल्याने स्वयंपाकघर साफ करूनही स्वच्छता होत नाही आणि कोरडे होण्यास अडचण येते. जास्त ओलेपणा आणि आर्द्रतेमुळे लहान बीटल, माश्या आणि झुरळे स्वयंपाकघरात येऊ लागतात. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात स्वच्छता आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.

पावसाळी वातावरणात किचनमध्ये तयार होणारे गरमागरम पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात. पण जर या काळात जर आपले घर विशेषतः स्वयंपाक घर अस्वच्छ आणि असुरक्षित असेल तर मात्र पावसामुळे प्रसन्न झालेलं मन उदास होऊ शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात बाहेर सगळीकडे ओलावा आणि चिखल असतो. ज्यामुळे घरातील वातावरणाही उबदार आणि कुबट होण्याची शक्यता वाढते. ज्याचा परिणाम घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होऊ शकतो. यासाठीच पावसाळ्यात घराची आणि स्वयंपाक घराची विशेष निगा राखायला हवी(HOW TO KEEP YOUR KITCHEN CLEAN DURING THE MONSOON SEASON).

पावसाळ्यात स्वयंपाक घराची निगा कशी राखावी... 

१. कापडा ऐवजी वाईप्सचा वापर करावा :-  स्वयंपाकघरात भांडीपासून ते फरशीपर्यंत पुसण्यासाठी अनेक कपडे वापरले जातात. ते स्वच्छ करणे सोपे आहे, परंतु पावसाळ्याच्या दिवसात हे कपडे स्वच्छ करणे आणि वाळवणे खूप कठीण आहे. अशावेळी किचनमध्ये कापडाच्या ऐवजी वाइप्सचा वापर करावा म्हणजे साफसफाईही होते आणि वाइपिंग कापड साफ करताना कोणतीही अडचण येत नाही.

२ स्मार्ट झटपट ट्रिक्स, प्लास्टिक पिशवीची घाला नाजूक -लहानशी घडी, शेकडो पिशव्या सहज साठवा!

२. वायपरचा वापर करावा :- भांडी धुतल्यानंतर, सिंकच्या आजूबाजूला आणि स्लॅबमध्ये पाणी असते, जे पावसाच्या ओलाव्यामुळे लगेच सुकत नाही. त्यामुळे किचनमध्ये घाण व जंतू पसरण्याची भीती असते. अशावेळी कापडाच्या ऐवजी छोटे वायपर वापरून ते पाणी स्वच्छ करून घ्यावे. भांडी धूत असताना सिंक मधील पाणी किचन स्लॅबवर इतरत्र बाहेर उडते. त्यामुळे किचनमध्ये पाण्याने जास्तीचा ओलावा राहू शकतो. हा ओलावा आणि पाणी काढून टाकण्यासाठी वायपरचा वापर करावा. वायपरच्या मदतीने किचन स्लॅबवरील जास्तीचे पाणी ओढून सिंकमध्ये टाकता येते. यासाठी पावसाळ्याच्या दिवसात किचनमध्ये वायपरचा वापर करावा.  

३. साबणा ऐवजी लिक्विड डिश वॉशचा वापर करा :- आपण स्वयंपाकघरात भांडी धुण्यासाठी शक्यतो डिशवॉश बारचाच वापर करतो. इतर वेळी डिशवॉश बारचा वापर करणे योग्य आहे. परंतु पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि ओलाव्यामुळे हा डिशवॉश बार ओला चिंबच राहतो, तसेच तो बार जास्तच ओला झाल्यामुळे हळूहळू पाण्यांत विरघळू लागतो. या विरघळलेल्या साबणामुळे भांडी स्वच्छ करण्याऐवजी अधिकच घाण होतात. यामुळे अशा परिस्थितीत डिशवॉश बार पेक्षा लिक्विड डिश वॉश वापरणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पावसाळ्यात भांडी धुण्यासाठी लिक्विड डिश वॉश वापरावे. 

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

४. धुतलेली भांडी ठेवण्यासाठी बास्केटचा वापर करावा :- पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे धुतलेली भांडी लगेच सुकत नाहीत. ही व्यवस्थित न सुकलेली भांडी तशीच ठेवल्यास त्यात कुबट वास येऊ लागतो. भांड्यांमधील हा कुबट वास येऊ नये म्हणून भांडी व्यवस्थित वाळवून घ्यावीत. किचनमध्ये सिंकच्या शेजारी एखादी जाळीची टोपली किंवा प्लास्टिकचे बास्केट ठेवावे जेणेकरून भांडी स्वच्छ आणि लवकर सुकतील. भांडी धुतल्यानंतर त्यात भांडी ठेवल्यास भांड्यांमध्ये असलेले पाणी लगेच निथळून जाऊन भांडी लवकर सुकतात.

५. नियमित स्वच्छता राखणे गरजेचे :- पावसाळ्यात किचनमध्ये  छोटे मोठे किडे आणि किटक येण्याची शक्यता वाढते. बाहेरील वातावरणात झालेल्या बदलांमुळे हे जीवजंतू तुमच्या घराचा आसरा घेतात. मात्र त्यामुळे तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठीच पावसाळ्यात दिवसभरात दोनदा किचन स्वच्छ करा. किचनच्या ट्रॉली आणि  कपाटांमध्ये झुरळ येत असेल तर पावसाळ्याआधी घर पेस्ट कंट्रोल करून घ्या.

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

६. इलेक्ट्रॉनिक वस्तू :- आधुनिक युगात वेळ वाचवण्यासाठी स्वयंपाक घरात आपण अनेक इलेक्ट्रॉनिक साधने वापरत असतो. मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, भाज्या धुण्याचे मशीन, डिश वॉशर, वॉटर प्युरिफायर, फूड प्रोसेसर, ओव्हन, मायक्रोव्हेव, एसी, फॅन अशा अनेक गोष्टी तुमच्या किचनमध्ये असू शकतात. मात्र लक्षात ठेवा पावसाळ्याआधी यासर्व वस्तू वीजेसोबत जोडणारी यंत्रणा सुरक्षित आहे का हे तपासणं गरजेचं आहे. कारण किचनमध्ये काम करत असताना चुकून तुमचा ओला हात या वस्तूंना लागल्यामुळे शॉक लागण्याची शक्यता वाढते. यासाठीच वेळीच किचन सुरक्षित करून घ्या.

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...

Web Title: HOW TO KEEP YOUR KITCHEN CLEAN DURING THE MONSOON SEASON

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.