Lokmat Sakhi >Social Viral > कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होतो? ३ टिप्स- कपाट नेहमीच राहील नेटकं- टापटीप

कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होतो? ३ टिप्स- कपाट नेहमीच राहील नेटकं- टापटीप

How To Keep Your Wardrobe Always Neat And Clean?: कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होत असेल तर या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून पाहा..(best hacks to maintain your cupboard)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 05:17 PM2024-10-07T17:17:59+5:302024-10-07T17:18:47+5:30

How To Keep Your Wardrobe Always Neat And Clean?: कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होत असेल तर या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून पाहा..(best hacks to maintain your cupboard)

how to keep your wardrobe always neat and clean, best hacks to maintain your cupboard  | कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होतो? ३ टिप्स- कपाट नेहमीच राहील नेटकं- टापटीप

कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होतो? ३ टिप्स- कपाट नेहमीच राहील नेटकं- टापटीप

Highlightsतुम्ही आवरलेलं कपाट पुढचे कित्येक महिने जशास तसं अगदी नीटनेटकं आणि टापटीप राहण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा..

९० टक्के घरांमध्ये अशीच परिस्थिती असते की कपड्यांचे कपाट म्हणजेच आपला वॉर्डरोब कितीही आवरला तरी तो पुन्हा काही दिवसांतच अगदी जशास तसा होऊन जातो. कपडे सगळीकडे पसरलेले दिसतात. त्यातला एकही कपडा किंवा वस्तू जागच्याजागी राहात नाही. असं झालं की मग त्या कपाटातल्या पसाऱ्याकडे पाहून आपण वैतागून जातो. काही मोजके अपवाद वगळता सगळ्यांचीच कहानी जवळपास अशीच आहे (how to keep your wardrobe always neat and clean?). म्हणूनच तुम्ही आवरलेलं कपाट पुढचे कित्येक महिने जशास तसं अगदी नीटनेटकं आणि टापटीप राहण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा...(best hacks to maintain your cupboard)

 

कपाट नेहमीच नेटकं, आवरलेलं राहावं यासाठी टिप्स 

१. तुमच्या कपाटातल्या सगळे कपडे बाहेर काढा आणि त्यातले तुम्हाला जे कपडे खूपच कमी वेळेस म्हणजेच वर्षातून अगदी एक दोन वेळाच लागतील असे कपडे बाजूला काढा.

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

हिवाळ्यात लागणारे तसेच इतर सिझनल कपडेही बाजूला काढा. हे कपडे ठेवण्यासाठी एखादी छानशी आटोपशीर सुटकेस किंवा कपड्याची बॅग घ्या आणि त्या बॅगेत सरळ असे जास्तीचे, कधीकधीच लागणारे कपडे भरून ठेवा. म्हणजे त्यांचा कपाटात मुळीच पसारा दिसणार नाही. 

 

२. नेहमीच लागणारे पंजाबी ड्रेस किंवा नेहमीच्या वापरण्याच्या साड्या ठेवण्यासाठी साडी कव्हरचा वापर करा. हँगरला अगदी मोजके कपडे ठेवा. जे कपडे तुम्हाला नेहमीच लागतात तेच कपडे हँगरला अडकवून ठेवा.

रेखा म्हणतात- अभिनेत्री होणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं! त्याऐवजी 'या' गोष्टीत इंटरेस्ट होता, पण..... 

बाकीच्या कपड्यांच्या छान घड्या घाला आणि ते ठेवण्यासाठी साडी बॅग वापरा. एका साडीबॅगमध्ये फार फार तर दोन ड्रेस ठेवा. यामुळे जो कपडा पाहिजे तेवढीच बॅग फक्त बाहेर येईल आणि इतर कपडे पांगून त्यांचा पसारा होणार नाही.

 

३. रुमाल, टॉवेल, छोटे कपडे ठेवण्यासाठी प्लास्टिकचे छोटे- छोटे बॉक्स किंवा बाजारात विकत मिळणारे कबर्ड ऑर्गनायझर वापरा. प्रत्येक प्रकारच्या कपड्याचा बॉक्स वेगवेगळाच असू द्या.

मनी प्लांट वाढतच नाही? मातीत टाका 'ही' खास गोष्ट, मनी प्लांट वाढेल भराभर- कधीच सुकणार नाही

यामुळे मग कधीही कपाट उघडलं तरी कपाटात नुसते एकावर एक रचलेले बॉक्स दिसतील. त्या बॉक्स मधला पसारा दिसणार नाही. अशावेळी मग तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा एकेक बॉक्स काढून त्यातले कपडे आवरले तरी चालते. 

 

Web Title: how to keep your wardrobe always neat and clean, best hacks to maintain your cupboard 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.