उन्हाळा सुरु झाला की, शरीराला थंड करणारे पदार्थ आपण जास्त खातो. यासह थंड पाण्याची देखील डिमांड वाढते. गरम वातावरणातून आलं की काही तरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. उन्हाळा आला की लोकं फ्रिजमधलं थंड पाणी प्यायला सुरुवात करतात. पाणी थंड करण्यासाठी आपण फ्रिजचा उपयोग करतो. पण फ्रिजचे पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.
फ्रिजचे पाणी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आपण फ्रिजचा वापर न करता, नैसर्गिकरित्या पाणी थंड करू शकता. नैसर्गिकरित्या थंड केलेले हे पाणी केवळ तहान शमवण्यास मदत करत नाही, तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे फ्रिजचे पाणी पिण्यापेक्षा, या सोप्या पद्धतीचा वापर करून पाण्याला थंड ठेऊ शकता(Tips To Keep Your Water Cool In Summers Without A Fridge).
मडक्याला गोणीने गुंडाळून ठेवा
उन्हाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये मडक्यात पाणी साठवायला सुरुवात होते. फ्रिजच्या पाण्याच्या तुलनेत मडक्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. या पाण्यामुळे तहान सहज भागते. ज्या घरांमध्ये फ्रिज आहे, त्यांच्या घरी देखील मडके आढळते. उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी मडक्यात पाणी साठवून ठेवा. व मडके जाड सुती कापड किंवा गोणीने गुंडाळून ठेवा. यानंतर गोणीभोवती पाणी घाला. यामुळे पाणी खूप थंड राहील.
घरात लावा ही ५ रोपं, तुमच्या घरात उन्हाळयात चुकूनही डास येणार नाहीत...
तांब्याचे भांडे वापरा
मातीच्या भांड्याव्यतिरिक्त तांब्याच्या भांड्यात देखील पाणी थंड राहू शकते. पाणी थंड ठेवण्याचा हा एक नैसर्गिक उपाय आहे. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा, सकाळपर्यंत पाणी थंड होईल. तांब्याच्या भांड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, तांब्याचे तापमान वाढले की त्यातील पाणी आणखी थंड होते. यासह आरोग्यात देखील सुधार होते.
मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक
कूलिंग फॅनची मदत घ्या
उन्हाळ्यात पाणी लवकर थंड होण्यासाठी आपण कुलिंग फॅनची मदत घेऊ शकता. भांड्याचे पाणी लवकर थंड करायचे असेल तर, भांड्यावर पोती गुंडाळून ठेवा, त्यावर पाणी टाकून ओले करा. यानंतर भांड्याच्या बाजूला टेबल फॅन ठेवा. या ट्रिकमुळे पाणी लगेच थंड होईल.