हल्ली सोन्याचे गगनाला भिडलेले भाव आणि सोनसाखळी चोरट्यांनी ओढून घेण्याच्या भरदिवसा झालेल्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो, वाचत असतो. त्यामुळे खरंतर गळ्यात सोन्याची साखळी घालून फिरण्याची भीतीच वाटते. काही जणींना तर कायम ही धास्ती असते की आपण घातलेल्या सोन्याच्या साखळीचं किंवा शॉर्ट मंगळसूत्राचं हूक उघडलं तर जाणार नाही ना, (simple hacks and tricks to lock gold chain hook) सोन्याची साखळी किंवा मंगळसूत्र गळ्यातून पडून तर जाणार नाही ना? तुम्हालाही अशाच पद्धतीची भीती कायम वाटत असेल तर सोन्याच्या साखळीचं, शॉर्ट मंगळसूत्राचं किंवा मग एखाद्या नेकलेसचं मागचं हूक कशापद्धतीने एकदम पक्कं पॅक करून टाकायचं ते एकदा बघाच....(how to Lock Gold Chain hook Perfectly?)
सोनसाखळीचं, मंगळसूत्राचं लॉक कसं पॅक करावं?
सोनसाखळी किंवा मंगळसूत्राच्यामागे असणारं हूक अगदी पक्कं पॅक करायचं असेल तर त्यासाठी कोणती सोपी युक्ती करावी, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ mommywithatwist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
चेहऱ्यावरची चमक गेली- त्वचा डल दिसते? 'हा' उपाय करा- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो येईल
यामध्ये असं सांगितलं आहे की साखळीला जे Sआकाराचं हूक असतं त्याच्यामध्ये जेव्हा आपण साखळीचे किंवा मंगळसूत्राचे दुसरे टोक अडकवितो तेव्हा त्यावरून कानातल्याला जी असते ती रबरी फिरकी अडकवून द्या. फिरकीमुळे हूक एकदम पक्के बसेल आणि हिसका बसला तरी साखळीचे दुसरे टोक हुकमधून निघून ती पडणार नाही.
हे उपायही करून पाहा
१. सोनसाखळीचं मागचं हूक अगदी पक्कं बसवायचं असेल तर छोट्याशा पकडेच्या मदतीने किंवा बोटानेच जोरात दाबून ते एकावर एक बसवा. अशाप्रकारे बसवा की हुकचा S आकार 8 या आकड्याप्रमाणे अगदी बंद होऊन जाईल.
२. हूकमध्ये अडकवलेली साखळी निघून जाऊ नये म्हणून सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचा एखादा दोरा घ्या आणि तो त्या हूकवर अगदी पक्का गुंडाळून टाका. असं केल्यानेही हूक निघून जाण्याचं टेन्शन राहात नाही.