Lokmat Sakhi >Social Viral > जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

Home Hacks: घरातले जुने चमचे काळपट पडले असतील किंवा त्यांच्यावरची चमक कमी झाली असेल,तर हे काही घरगुती उपाय करून बघा.(2 best home hacks to clean old steel spoon)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 02:53 PM2024-10-08T14:53:59+5:302024-10-08T14:55:13+5:30

Home Hacks: घरातले जुने चमचे काळपट पडले असतील किंवा त्यांच्यावरची चमक कमी झाली असेल,तर हे काही घरगुती उपाय करून बघा.(2 best home hacks to clean old steel spoon)

how to maintain shine on old steel utensils, 2 best home hacks to clean old steel spoon | जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

Highlightsहे काही सोपे उपाय बघा आणि यापैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो करून पाहा..

तसं पाहायला गेलं तर चमचे आणि ते ही खाण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे चमचे ही खरे तर स्वयंपाक घरातली अतिशय छोटीशी वस्तू. पण तुमच्या घरातली स्वच्छता कितपत आहे, याची परीक्षा एखादा व्यक्ती त्या छोट्याशा चमच्यांवरूनही करू शकतो. म्हणूनच चमचे काळपट पडलेले असतील किंवा जुने झाल्यामुळे त्यांची चमक गेली असेल तर ते पुन्हा नव्यासारखे चकचकीत करणे गरजेचे आहे (how to maintain shine on old steel utensils?). त्यासाठीच हे काही सोपे उपाय बघा आणि यापैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो करून पाहा.. चमच्यांची हरवलेली चमक नक्कीच पुन्हा येईल.(2 best home hacks to clean old steel spoon)

 

काळपट पडलेले चमचे स्वच्छ करण्याचे उपाय 

काळपट पडलेले चमचे स्वच्छ करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील, याविषयी माहिती सांगणारा एक सोपा घरगुती उपाय dadecordiaries and dacookingdiaries या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

सायीच्या दह्यापासून लोणी निघायला खूपच वेळ लागतो? ३ टिप्स- लोणी आणि तूप दोन्हीही भरपूर होईल... 

पहिला उपाय 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी चमचे थोडेसे ओलसर करून घ्या. ओलसर झाल्यानंतर प्रत्येक चमच्यावर टुथपेस्ट लावून ते पंधरा मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर कोणतेही डिशवॉश लिक्विड वापरून तारेच्या घासणीने चमचे घासून काढा आणि कोमट पाण्याने धुवून घ्या. तुमचे चमक गेलेले चमचे अगदी नव्यासारखे चमकू लागतील.


दुसरा उपाय

दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करायचा आहे. त्याचा वापर करून ज्याप्रमाणे चांदी आणि ऑक्सिडाईज वस्तू स्वच्छ करता येतात, त्याचप्रमाणे स्टीलच्या वस्तूही चकचकीत करता येतात.

कशाला हवेत महागडे डी- टॅन आणि फेसपॅक? केळीचं साल घेऊन 'हा' उपाय करा- चेहरा चमकेल

हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि ते पातेले गॅसवर गरम करायला ठेवा. त्या पातेल्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईलचे काही तुकडे टाका आणि चमचेही टाकून ठेवा. १० ते १५ मिनिटे ते पाणी खळखळ उकळू द्या. त्यानंतर चमचे बाहेर काढल्यास ते आधीपेक्षा खूपच जास्त चमकदार झाल्याचे जाणवतील. 

 

Web Title: how to maintain shine on old steel utensils, 2 best home hacks to clean old steel spoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.