Lokmat Sakhi >Social Viral > फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे

फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे

How Do We Keep Light Clothes Bright: पांढरे किंवा फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर हा अनुभव अनेकदा येतो. म्हणूनच हा एक सोपा उपाय करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 05:25 PM2022-12-17T17:25:46+5:302022-12-17T17:26:32+5:30

How Do We Keep Light Clothes Bright: पांढरे किंवा फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर हा अनुभव अनेकदा येतो. म्हणूनच हा एक सोपा उपाय करून बघा.

How to maintain the shine on light coloured or white clothes? Washing tips for light colour clothes  | फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे

फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे

Highlightsफिक्या कपड्यांचा रंग कायम नव्यासारखा, चमकदार रहावा, म्हणून या काही गोष्टी करून बघा.

पांढरे किंवा फिक्या रंगाचे कपडे आपण हौशीने विकत घेतो. कारण हे कपडे आपल्याला एक फ्रेश, रॉयल लूक देणारे असतात. पण या कपड्यांची काळजी घेणं सोपं काम नाही. कारण एकतर हे कपडे घातल्यावर त्यावर डाग लागतील का अशी एक भीती कायम आपल्या मनात असते. शिवाय हे कपडे वारंवार धुतले तर त्यांचा रंग आणखीनच खराब होतो आणि ते डल दिसू लागतात. म्हणूनच फिक्या कपड्यांचा रंग कायम नव्यासारखा, चमकदार रहावा, म्हणून या काही गोष्टी करून बघा. (How to brighten light colour or white clothes?)

फिक्या कपडे कायम चमकदार दिसावे म्हणून..
हा उपाय तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे धुण्यासाठीही करू शकता. हा उपाय इन्स्टाग्रामच्या urban_naree या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

१. मीठ वापरा
फिकट किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे धुण्यासाठी मिठाचा वापर करणे हा एक चांगला आणि स्वस्तात मस्त असा पर्याय आहे. तुम्ही कपडे जर मशिनमध्ये धुणार असाल तर प्रत्येक वेळी कपडे धुताना वॉशिंग पावडरसोबत मीठदेखील घाला.

भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

एका कपड्यासाठी एक टेबलस्पून या प्रमाणात मीठ घालावे. कपड्यांना डलनेस येणार नाही. वॉशिंग मशिन नसेल आणि हाताने कपडे धुणार असाल तरीही कपडे भिजत घालताना एका कपड्यासाठी एक टेबलस्पून मीठ हे प्रमाण वापरावे आणि त्या पाण्यात तासभर कपडे भिजवून नंतरच धुवावेत. 

 

२. व्हिनेगरचा वापर
दुसरा उपाय म्हणजे कपडे धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करणे. यासाठी ४ लीटर गरम पाणी घ्यावे. त्यात १ कप व्हाईट व्हिनेगर टाकावे.

मुलं सारखं उलटून बोलतात, कसं समजवावं कळेना? ५ टिप्स.. मुलं होतील शहाणी- समजूतदार

या पाण्यात साधारण अर्धा ते पाऊण तास कपडे भिजत घालावेत आणि त्यानंतर धुवावेत. ४ लीटर पाण्यात साधारणपणे ३ ते ४ कपडे भिजत टाकावेत. मशिनमध्ये कपडे धुणार असाल तर एका कपड्यासाठी १ टेबलस्पून व्हिनेगर आणि वॉशिंग पावडर टाकावी.  

 

Web Title: How to maintain the shine on light coloured or white clothes? Washing tips for light colour clothes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.