केमिकल्स असणारं कुंकू वापरलं तर कपाळावर, हाताला, फरशीवर, कपड्यांवर कुंकवाचे डाग पडतात. ते डाग मग काही केल्या निघत नाही. असं केमिकल्स असणारं कुंकू वापरलं तर अनेक जणींना कपाळावर खाज येण्याचाही त्रास होतो. कुंकू विकणारे अनेक जण केमिकल्स असणारं कुंकू हळदीचं आहे, शुद्ध आहे, असं म्हणून जास्त किंमतीला विकतात आणि त्यात आपली फसवणूक होते. म्हणूनच आता घरच्याघरी हळद वापरून १०० टक्के शुद्ध असणारं कुंकू (Homemade kunku) कसं तयार करायचं ते पाहा. (How to make 100 percent natural kumkum at home)
हळदीचं कुंकू घरीच तयार करण्याची पद्धत
घरच्याघरी हळद वापरून शुद्ध कुंकू कसं तयार करायचं, याविषयीचा व्हिडिओ aapli_aaji या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कुंकू तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी हळद, १ चमचा बेकिंग सोडा, १ लिंबू, १ चमचा शुद्ध तूप, १ चमचा गुलाबजल आणि थोडा कापूर लागणार आहे.
Anant- Radhika Wedding: ईशा अंबानीने घातला होता सुंदर थ्रीडी गाऊन- बघा काय त्याची खासियत
सगळ्यात आधी तर एका भांड्यात हळद काढून घ्या. त्या हळदीमध्ये बेकिंग सोडा घाला आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्या.
यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकून पुन्हा एकदा सगळं मिश्रण १ ते २ मिनिटांसाठी व्यवस्थित हलवून घ्या.
आता कुंकू सुवासिक होण्यासाठी त्यामध्ये थोडं गुलाबाचं पाणी टाका तसेच ओलसरपणामुळे कुंकू खराब होऊ नये म्हणून त्यात थोडा कापूर टाका.
मुलांना उत्तम व्यक्ती म्हणून घडवायचं तर टिनएजर्स होण्यापुर्वी त्यांना 'या' ३ गोष्टी शिकवाच...
पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि काही मिनिटांसाठी तसेच राहू द्या.
हळद, लिंबू, बेकिंग सोडा यांची एकमेकांत रिॲक्शन होते आणि हळदीचा रंग बदलून लालसर होऊन जातो. जेव्हा कुंकवाचा रंग अगदी लालसर होईल तेव्हा ते उन्हात ठेवून चांगलं वाळवून घ्या आणि मग एखाद्या कोरड्या बाटलीत भरून ठेवा.