दिवाळी आता अवघ्या २- ३ दिवसांवर आली आहे. त्यामुळे सध्या बच्चे कंपनीला सुटी लागली असल्याने ती प्रचंड उत्साहात आणि आनंदात आहेत. त्यांचा हा उत्साह आणि दिवाळीचा आनंद सत्कारणी लावायचा असेल तर त्यांना हे आकाश दिवा बनविण्याचं मस्त काम देऊन टाका. घरच्याघरी आकाशदिवा बनवणं अगदी सोपं आहे. त्यामुळे मुलांच्या क्रियेटीव्हिटीला (creativity) वाव तर मिळेलच पण आपण केलेला आकाशदिवा घराबाहेर लावलाय, याचा त्यांना आनंदही होईल. घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने आकाशदिवा किंवा आकाश कंदिल कसा बनवायचा ते आता पाहूया (How to make akash diva or diwali lamp, lantern using box?)...
कसा तयार करायचा आकाशदिवा?
या पद्धतीमध्ये आपण खोक्यांचा वापर करून आकाश दिवे कसे तयार करायचे ते पाहूया..
बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....
सध्या दिवाळीनिमित्त आपण खरेदी करतच असतो. त्यामुळे मग त्यासोबत अनेक खोके किंवा बॉक्स घरात येतात. त्यापैकी मध्यम आकाराचा चौकोनी किंवा आयाताकृती बॉक्स आकाशदिवा करायला घ्या.
या बॉक्सचे चारही कोपरे तसेच ठेवा आणि मधला भाग कात्रीने किंवा ब्लेडने कापून टाका. तसेच खालचा भागही काढून टाका. वरचा भाग मात्र तसाच राहू द्या. तिथे फक्त लाईटची वायर सोडायला मधोमध एक छिद्र पाडून घ्या.
"टायगर ३ साठी फिटनेस कमावणं म्हणजे स्वत:च्या लिमिट्स.....", कतरिना कैफ सांगितेय तिचा खडतर अनुभव
जे चार कोपरे आहेत, त्यांना एखादा छान रंग द्या. किंवा मग एखादी लेस तिथे चिटकवून टाका. त्यानंतर संपूर्ण आकाश दिव्याला तुम्हाला आवडेल तशी चमकदार लेस गुंडाळून घ्या. खालच्या दिशेने छानसे गोंडे लावा आणि वरच्या बाजुनेही काहीतरी लेस लावून सुशोभित करा. वरच्या बाजुने अडकवायला एखादी दोरी लावा. त्यात लाईट सोडला की झाला छानसा आकाशदिवा तयार..