Join us  

१० मिनिटांत करा ३० दिवस पुरतील एवढ्या तूप वाती, देवाजवळ उजळेल प्रसन्न दिवा रोज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 2:10 PM

How to make Desi Ghee Diya Batti at Home : तुपाच्या वाती करताना हात चिपचिपे होतात, तूप सांडते हा त्रासच नाही. लावा सुंदर तूपवाती चटकन, घर होईल प्रसन्न

सकाळ संध्याकाळी पुजा करताना सगळेचजण दिवा, पणत्या लावत्यात.  दिव्याशिवाय पूजा संपन्न होत नाही. तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो. अशावेळी वाता बनवत बसण्यात बराच वेळ जातो. तुपामुळे हात चिकट होतात. जर तुपाच्या वाती आधीच तयार असतील तर तुमचा रोजचा वेळ वाचेल आणि पटकन  तुपाचा दिवा लावून होईल. (How to make ghee Batti) तुपाच्या वाती बनववण्याची इंस्टंट ट्रिक पाहूया. या वाती तुम्ही एकदा बनवल्यानंतर जवळपास २ ते ३ महिने वापरू शकता किंवा एका आठवड्यासाठीही बनवून ठेवू शकता. (How to make Desi Ghee Diya Batti)

घरगुती तुपाच्या वाती बनवण्याची पद्धत

साहित्य

१) अर्धा किलो- तूप

२) बी वॅक्स - १ पाकीट

३) कापूर - ८ ते १० गोळ्या

४) इसेंशियल ऑईल - ४ ते ५ थेंब

५) फूल वाती-  २० ते ३० (गरजेनुसार)

कृती

1) सगळ्यात  आधी एका भांड्यात तुम्ही वापरत असलेलं कोणतंही तूप काढून घ्या,  त्यात मधमाश्याचे मेण (Bee Wax), ८ ते १० कापूर घाला, गॅसवर भांडे ठेवून सतत ढवळत राहा. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर गॅस बंद करा.

2) भांड गॅसवरून खाली उतरवून त्यात मोगरा इंसेशियल ऑईलचे काही थेंब घाला. नंतर चॉकलेट्स बनवण्याच्या फ्लेक्सिबल  साच्यात एक-एक फुलवात ठेवून घ्या. 

3) वाती ठेवून झाल्यानंतर त्यात तूप घाला आणि फ्रिजरमध्ये ठेवा.  १ ते २ तासांनी फ्रिज उघडून साचा बाहेर काढा आणि साचा उलटा करून वाती हळूवार काढून घ्या.

4) गोठवलेल्या वाती एका स्वच्छ प्लास्टिकच्या डब्यात  ठेवा त्यानंतर हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. लागेल तसं या वाती बाहेर काढून वापरा. (What is the process of making ghee batti) 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल