Lokmat Sakhi >Social Viral > फादर्स डे स्पेशल : बाबासाठी स्पेशल काय करणार? ४ गोष्टी.. बाबाच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी खास भेट!

फादर्स डे स्पेशल : बाबासाठी स्पेशल काय करणार? ४ गोष्टी.. बाबाच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी खास भेट!

How to Make Father's Day Special for Your Dad? फादर्स डे : वडील आपल्यासाठी बरंच काही करतात, आपण त्यांना कधी सांगतो का, बाबा तू ‘खास’ आहेस..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 03:54 PM2023-06-15T15:54:52+5:302023-06-15T15:55:50+5:30

How to Make Father's Day Special for Your Dad? फादर्स डे : वडील आपल्यासाठी बरंच काही करतात, आपण त्यांना कधी सांगतो का, बाबा तू ‘खास’ आहेस..

How to Make Father's Day Special for Your Dad? | फादर्स डे स्पेशल : बाबासाठी स्पेशल काय करणार? ४ गोष्टी.. बाबाच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी खास भेट!

फादर्स डे स्पेशल : बाबासाठी स्पेशल काय करणार? ४ गोष्टी.. बाबाच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी खास भेट!

प्रेम दाखवत नसले तरी, आपल्यावर अफाट प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे वडील. खरंतर आई - वडील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे वडिलांची जागा देखील कोणीही घेऊ शकत नाही. वडील आपल्यासाठी दिवस रात्र एक करून कष्ट घेत असतात.

परिवाराला दोन वेळचं जेवण, घरातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वडील मेहनत घेत असतात. वडिलांची माया ही वेगळीच असते. ज्याप्रमाणे मदर्स डे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे फादर्स डे देखील साजरा करण्यात येतो. या फादर्स डे निमित्त बोलून न दाखवता कृतीतून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. वडिलांना खास सरप्राईज देऊन, हा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षणांपैकी एक बनवा(How to Make Father's Day Special for Your Dad?).

फादर्स डे बनवा खास

वडिलांना मुव्ही शोसाठी घेऊन जा

आपल्या वडिलांना मुव्ही डेटसाठी घेऊन जा. किंवा घरातच त्यांच्या आवडीचा चित्रपट लावा. घरातच पॉपकॉर्न, स्नॅक्सची व्यवस्था करा. ज्यामुळे वडिलांना नक्कीच स्पेशल फील होईल.

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत

वडिलांसोबत व्हेकेशन प्लॅन आखा

फादर्स डे निमित्त आपण आपल्या वडिलांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. एकत्र वेळ घालवल्याने  नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. व त्यांना देखील आनंद वाटेल.

वडिलांसोबत डिनर डेट

फादर्स डेच्या निमित्ताने आपण त्यांना डिनर डेटला घेऊन जाऊ शकता. त्यांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा, व त्यांच्या आवडत्या डिशेसची ऑर्डर द्या. किंवा आपण आपल्या घरातच त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवू शकता.

मुलांचा मेंदू तल्लख व्हावा, हुशार व्हावी मुलं असं वाटतं? आहारात हवेच ५ पदार्थ

बाबांसाठी खरेदी

पप्पा नेहमी कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजांची काळजी घेत असतात. प्रत्येकासाठी शॉपिंग करतात. पण स्वतःसाठी कधीच काही विकत घेत नाही. या फादर्स डे निमित्त आपण त्यांना शॉपिंगला घेऊन जाऊ शकता. किंवा त्यांच्यासाठी विशेष भेटवस्तू ऑर्डर करू शकता.

Web Title: How to Make Father's Day Special for Your Dad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.