Lokmat Sakhi >Social Viral > नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

How To Make Ghee Wicks Or Ghee Fulvat At Home: तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती विकत आणण्यापेक्षा नवरात्रीसाठी (Navratri 2024) घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फुलवाती कशा तयार करायच्या ते पाहूया...(simple method of making ghee fulvat or ghee wicks at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 12:04 PM2024-09-27T12:04:32+5:302024-09-27T12:05:25+5:30

How To Make Ghee Wicks Or Ghee Fulvat At Home: तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती विकत आणण्यापेक्षा नवरात्रीसाठी (Navratri 2024) घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फुलवाती कशा तयार करायच्या ते पाहूया...(simple method of making ghee fulvat or ghee wicks at home)

how to make ghee wicks or ghee fulvat at home, simple method of making ghee fulvat or ghee wicks at home | नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

Highlightsबाजारात ज्या फुलवाती मिळतात, त्यांच्यामध्ये मेण टाकलेेलं असतं असं म्हणतात. त्यामुळेच त्या व्यवस्थित जळत नाहीत.

ज्यांच्या घरी नवरात्र बसते, त्यांच्या घरी आता नवरात्रोत्सवाच्या तयारीला उत्साहात सुरुवात झालेली आहे (Navratri 2024). नवरात्रीच्या काळात अखंड दिवा (akhand diya) तर अनेकांच्या घरी असतोच. पण त्यासोबतच सकाळ- संध्याकाळ देवीची आरती करताना देवासमोर फुलवातसुद्धा लावली जाते. अनेक घरांमध्ये तर फक्त सणासुदीलाच नाही, तर एरवी दररोज तुपाची फुलवात देव्हाऱ्यात लावली जाते. हल्ली बाजारात तुपात भिजवलेल्या फुलवातीही मिळतात. पण त्या व्यवस्थित जळत नाहीत. वात संपते आणि तूप मात्र तसेच राहते, अशी तक्रार अनेकींची असते (simple method of making ghee fulvat or ghee wicks at home). म्हणूनच आता अशा भेसळीच्या फुलवाती वापरण्यापेक्षा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने तुपात भिजवलेल्या फुलवाती कशा तयार करायच्या ते पाहूया...(how to make ghee wicks or ghee fulvat at home?)

 

तुपात भिजवलेल्या फुलवाती तयार करण्याची पद्धत

बाजारात ज्या फुलवाती मिळतात, त्यांच्यामध्ये मेण टाकलेेलं असतं असं म्हणतात. त्यामुळेच त्या व्यवस्थित जळत नाहीत. तुपाचा दिवा म्हणून आपण त्या मोठ्या श्रद्धेने लावतो, पण त्यात तुपाऐवजी मेणाचेच प्रमाण अधिक असते.

ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा खूपच वयस्कर दिसतो? ४ सोप्या टिप्स- ओपन पोअर्स कमी होतील

म्हणूनच आता शुद्ध तूप वापरून फुलवाती कशा तयार करायच्या ते पाहा. तुपात भिजवलेल्या फुलवाती तयार करण्यासाठी बाजारात त्याचे साचेसुद्धा मिळतात. पण तुमच्याकडे ते नसतील तर बर्फाचे ट्रे वापरूनही तुम्ही फुलवाती करू शकता. त्या कशा कराव्या याची माहिती Goblet of honey या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

तुपात भिजवलेल्या फुलवाती तयार करण्याची सोपी पद्धत

यासाठी तुम्हाला एक मोठी वाटी भरून तूप लागणार आहे. सगळ्यात आधी एक पातेलं गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात तूप टाका. 

तूप थोडं वितळायला लागलं की त्यामध्ये साधारण २ ते ३ चमचे कापूर टाका. कापूर आणि तूप हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित वितळून एकजीव होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोराचे केस आहेत जाड आणि लांब- त्यासाठी करते 'हे' २ उपाय 

आता ज्या फुलवाती आहेत त्यांचा खालचा भाग थोडा पसरवून घ्या आणि त्या साच्यांमध्ये एकेक करून टाकून ठेवा. त्यानंतर चमच्याच्या मदतीने वितळवलेलं तूप त्या साच्यांमध्ये टाका. 

यानंतर साधारण २ ते ३ तासांसाठी ते साचे फ्रिजमध्ये ठेवून द्या. वाती छान सेट होतील. कापूर टाकलेल्या या वाती जेव्हा तुम्ही लावाल, तेव्हा त्यांचा सुगंध घरभर प्रसन्न वातावरण निर्माण करणारा ठरेल. 


 

Web Title: how to make ghee wicks or ghee fulvat at home, simple method of making ghee fulvat or ghee wicks at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.