Lokmat Sakhi >Social Viral > डास चावतात, डेंग्यू-मलेरियाचा धोका? केमिकलयुक्त रिपेलेंटची ॲलर्जी? २ गोष्टी वापरुन घरीच करा जादूई उपाय...

डास चावतात, डेंग्यू-मलेरियाचा धोका? केमिकलयुक्त रिपेलेंटची ॲलर्जी? २ गोष्टी वापरुन घरीच करा जादूई उपाय...

How to make homemade mosquito repellent with cinnamon oil & olive oil : How to Make Homemade Essential Oil Insect Repellent Spray : नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्याघरीच करा मॉस्किटो रिपेलेंट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 05:28 PM2024-08-14T17:28:48+5:302024-08-14T17:39:58+5:30

How to make homemade mosquito repellent with cinnamon oil & olive oil : How to Make Homemade Essential Oil Insect Repellent Spray : नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्याघरीच करा मॉस्किटो रिपेलेंट...

How to make homemade mosquito repellent with cinnamon oil & olive oil How-to Make Homemade Essential Oil Insect Repellent Spray | डास चावतात, डेंग्यू-मलेरियाचा धोका? केमिकलयुक्त रिपेलेंटची ॲलर्जी? २ गोष्टी वापरुन घरीच करा जादूई उपाय...

डास चावतात, डेंग्यू-मलेरियाचा धोका? केमिकलयुक्त रिपेलेंटची ॲलर्जी? २ गोष्टी वापरुन घरीच करा जादूई उपाय...

ऋतू कोणताही असो आपल्या आजूबाजूला डास कायमच भुणभुणत असतात. यातही पावसाळ्यात डासांचे प्रमाण अधिक असते. पावसाळ्यात साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढते. हे डास घरात येऊन आपल्याला चावतात. डास चावल्याने होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी डास पळवण्याचे विविध उपाय आपण करतो. आपल्याला डास चावू नयेत यासाठी आपण अनेक प्रकारे प्रयत्न करतो. दिवसभर गुड नाइट वापरणं किंवा डास पळवणाऱ्या कॉईल जाळणं हे उपाय करूनही जर डास चावतच राहिले तर डास जवळ येऊ नये, चावू नये म्हणून अंगाला मॉस्किटो रिपेलण्ट लावले जाते(How to Make Homemade Essential Oil Insect Repellent Spray).

डास चावण्याचा आणि आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी हा एक प्रभावी उपाय म्हणून लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत बहुतांश लोक डास दूर पळवणारे क्रिम अंगाला चोपडूनच घरात किंवा घराबाहेर पडतात. या क्रिम्समुळे डासांचा त्रास तर कमी होतोच परंतु त्याचे त्वचेवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. मॉस्किटो रिपेलण्टमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक घटकांचा भरपूर वापर केलेला असतो. हे घटक आपल्या त्वचेसाठी हानिकारक मानले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या मॉस्किटो रिपेलेंटमध्ये (How to Make Homemade Mosquito Repellent That Will Actually Prevent Bites) अनेक रसायने असतात आणि ती डासांसाठी प्रभावी असतात, परंतु आपल्या स्किनसाठी ते फायदेशीर नसते. अशावेळी आपण घरातील नेहमीच्या वापरातील काही नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्या घरी अगदी झटपट मॉस्किटो रिपेलेंट तयार करु शकतो. दालचिनीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने मॉस्किटो रिपेलेंट अगदी सहज तयार करता येते, ते कसे तयार करावे हे पाहुयात(How to make homemade mosquito repellent with cinnamon oil & olive oil).

नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट कसे तयार करावे ?

साहित्य :- 

१. दालचिनी तेल - १० ते १५ थेंब 
२. ऑलिव्ह ऑइल - २ टेबलस्पून  
३. स्प्रे बाटली - १ बाटली 

स्वतःचाच खूप राग येतो, वाटते आपण नालायक आहोत? ३ उपाय, पडाल स्वतःच्याच प्रेमात...

कृती :- 

१. एका लहान स्प्रे बाटलीमध्ये ऑलिव्ह ऑइल ओतावे. 
२. त्यात १० ते १५ थेंब दालचिनीचे तेल घालावे.
३. आता हे मिश्रण नीट ढवळून घ्यावे जेणेकरून दोन्ही तेल चांगले एकजीव होईल.

कमोड स्वच्छ ठेवण्यासाठी महागडे फ्रेशनर- क्लिनर्स आणता? १ सोपा घरगुती उपाय, इन्फेक्शनही राहील दूर...

मॉस्किटो रिपेलेंट वापरण्याची पद्धत :- 

१. तुमच्या त्वचेच्या उघड्या भागांवर आणि डासांच्या संपर्कात येऊ शकणाऱ्या भागांवर हे नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट स्प्रे करुन लावावे. 
२. हे मॉस्किटो रिपेलेंट थेट तुमच्या त्वचेवर स्प्रे करा.
३. स्प्रे बाटलीत भरुन स्टोअर करुन ठेवलेले मॉस्किटो रिपेलेंट वापरण्यापूर्वी ते नेहमी नीट हलवून घ्यावे जेणेकरून दोन्ही तेलं चांगली मिक्स होतील. 
४. जर तुम्ही घरातील लहान मुलासाठी हे मॉस्किटो रिपेलेंट वापरत असाल तर सर्वातआधी त्वचेवर थोडेसे लावून बघावे आणि काही ऍलर्जी किंवा प्रतिक्रिया येते का ते पहावे.
५. हे नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट तुमची त्वचा सुरक्षित ठेवण्यासोबतच डासांपासून तुमचे संरक्षण करण्यात मदत करेल.

Web Title: How to make homemade mosquito repellent with cinnamon oil & olive oil How-to Make Homemade Essential Oil Insect Repellent Spray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.