Lokmat Sakhi >Social Viral > १ वाटी तांदळाचे करा मऊ -जाळीदार अप्पम; केरळस्टाईल अप्पमची परफेक्ट रेसिपी

१ वाटी तांदळाचे करा मऊ -जाळीदार अप्पम; केरळस्टाईल अप्पमची परफेक्ट रेसिपी

How To Make Kerala Style Appam At Home Without Yeast : अप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:13 PM2024-02-05T13:13:05+5:302024-02-05T13:37:10+5:30

How To Make Kerala Style Appam At Home Without Yeast : अप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या.

How To Make Kerala Style Appam At Home : Appam Making Recipe Right Method Of Making Appam Recipe | १ वाटी तांदळाचे करा मऊ -जाळीदार अप्पम; केरळस्टाईल अप्पमची परफेक्ट रेसिपी

१ वाटी तांदळाचे करा मऊ -जाळीदार अप्पम; केरळस्टाईल अप्पमची परफेक्ट रेसिपी

नाश्त्याला (Breakfast) साऊथ इंडियन पदार्थ खायला अनेकांना आवडतं. (Breakfast Recipe) नेहमी बाहेरून विकत न आणता घरच्याघरी तुम्ही  नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता. अप्पम बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. डोसा किवा इडलीच्या बॅटरप्रमाणे बॅटर आंबवण्यासाठी ठेवावे लागेल. मऊ अप्पम तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Kerala Style Appam At Home)

अप्पम बनवण्यासाठी मुख्य साहित्य म्हणजे तांदूळ. (Right Method Of Making Appam Recipe) पदार्थाला चांगली चव येण्यासाठी तांदूळ चांगल्या क्वालिटीचे निवडा. हे बॅटर बनवण्याआधी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. जेव्हा तांदूळ व्यवस्थित भिजलीत तेव्हा स्मूथ आणि सॉफ्ट बॅटर तयार होईल. मऊ अप्पम होण्यासाठी तांदूळ चांगले निवडण्याची गरज असते. (Appam Batter Recipe)

केरळास्टाईल अप्पम बनवण्यासाठी लागणारं साहित्य  (Kerala Style Appam Making Steps)

१) साधा तांदूळ- १ कप

२) पॅराबॉईल्ड  राईस -१ कप

३) किसलेले नारळ- १ कप

४) साखर- १ टेबलस्पून

५) मीठ- १ चमचे

६) १/२ इस्ंटट यीस्ट

7) पाणी- अर्धा कप

अप्पम बनवण्याची सोपी कृती (How to Make Appam At Home)

१) अप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ भिजवायला ठेवा ४ ते ५ तासांसाठी तांदूळ भिजवून  ठेवा.

२) तांदूळ भिजवल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात  भिजवलेले तांदूळ, पॅराबॉईल्ड राईस, खोबऱ्याचा किस, साखर आणि मीठ, इंस्टंट ड्राय यिस्ट आणि पाणी घालून मिक्सरला लावून  मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्या. 

३) तयार पीठ एका भांड्यात काढून घ्या.  चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात अप्पमचे मिश्रण घाला आणि हे मिश्रण झाकून ठेवून द्या. चमच्याच्या साहाय्याने खरडवून अप्पम काढून घ्या. 

4) ओल्या नारळाची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा सांबार, बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही अप्पम खाऊ शकता.  अप्पम खायला अतिशय सॉफ्ट लागते. आपल्या आवडीनुसार तुम्ही नाश्त्याला, दुपारच्या  जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला अप्पम खाऊ शकता. 

Web Title: How To Make Kerala Style Appam At Home : Appam Making Recipe Right Method Of Making Appam Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.