Lokmat Sakhi >Social Viral > रात्री डास चावल्याने सतत झोपमोड होते? डासांना पळवून लावण्यासाठी १ सोपा रामबाण उपाय

रात्री डास चावल्याने सतत झोपमोड होते? डासांना पळवून लावण्यासाठी १ सोपा रामबाण उपाय

How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून करता येईल अशी सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 11:39 AM2023-05-02T11:39:09+5:302023-05-02T11:47:34+5:30

How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून करता येईल अशी सोपी ट्रिक

How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : Does mosquito bites cause constant sleeplessness at night? 1 simple home remedy to repel mosquitoes | रात्री डास चावल्याने सतत झोपमोड होते? डासांना पळवून लावण्यासाठी १ सोपा रामबाण उपाय

रात्री डास चावल्याने सतत झोपमोड होते? डासांना पळवून लावण्यासाठी १ सोपा रामबाण उपाय

संध्याकाळच्या वेळी आपण चुकून गॅलरीचे दार, खिडक्या बंद करायला विसरलो की घरात डासांचा सुळसुळाट होतो. रात्री आपण बेडवर शांत पडलो की हे डास आपल्याला फोडून खायला सुरुवात करतात. मग कधी त्यांना मारण्यासाठी रॅकेट तर कधी आणखी काही उपाय वापरुन आपण त्यांना पळवून लावतो. उन्हाळ्याच्या दिवसांत गरम होत असल्याने अंगावर पांघरुण घेणेही शक्य नसते. अशावेळी डासांमुळे झोपमोड झाली की आपली चिडचिड होते. एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात. डास चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो, त्याची आग होते (How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home). 

हे डास साधे असतील तर ठिक नाहीतर डेंगी, चिकनगुन्या यांचे डास असतील तर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. डास हे केवळ साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही डासांचे प्रमाण वाढू शकते. डासांना पळवून लावणारे काही उपाय लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरीकांना आरोग्यासाठी घातक असतात. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? पूनम देवनानी घरात उपयुक्त ठरतील अशा काही सोप्या टिप्स नेहमी शेअर करत असतात. इतकेच नाही तर वेगवेगळ्या हटके रेसिपी आणि त्याच्याशी निगडीत टिप्सही त्या आपल्याला सांगतात. नुकतीच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी डासांना पळवून लावण्यासाठी एक सोपी ट्रिक शेअर केली असून ती कशी करायची पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. कडूनिंबाची भरपूर पाने घ्यायची आणि ती दांडीपासून मोकळी करुन कागदावर वाळायला ठेवायची. 

२. किमान २ दिवस ही पाने चांगली वाळली की हाताने चुरगाळून त्याचा चुरा करायचा. 

३. यामध्ये कांदा आणि लसणाची साले आणि तमालपत्र हाताने बारीक करुन घालायचे. 

४. यात ५ ते ६ लवंग आणि ५ ते ६ कापूराच्या वड्या घालून हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे. हा चुरा एका बरणीत साठवून ठेवू शकतो.

५. मातीच्या पणत्यांमध्ये हा मिक्सर केलेला भुगा ठेवायचा आणि त्यात कापूराची छोटी वडी पेटवून ठेवायची म्हणजे धूर होतो.

६. अशा पणत्या प्रत्येक खोलीत ठेवल्या की धूर पसरतो. तमालपत्र, कडूनिंब, लसणाची सालं याचा वास उग्र असल्याने डास पळून जाण्यास याची चांगली मदत होते.  

Web Title: How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : Does mosquito bites cause constant sleeplessness at night? 1 simple home remedy to repel mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.