आपल्याकडे (Diwali 2024) लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Puja New Broom) दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून, त्याला हळद, कुंकू लावून पूजा करतात. पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडूने घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढण्याची पद्धत आहे. घराची साफसफाई - स्वच्छता ठेवण्यासाठी झाडू वापरला जातो. झाडू ही अशी वस्तू आहे, जी एकदा घेतल्यास वर्षभर आरामात वापरता येते. नवीन झाडू वापरायला काढल्यावर एक सर्वात मोठी अडचण (try these 4 hacks before using new broom) होते, ती म्हणजे या नव्या झाडूचा वारंवार पडणारा भुसा. नवीन झाडू वापरायला काढल्यावर पुढील काही दिवस या नवीन झाडूचा भुसा सारखा पडत राहतो. झाडूने घरातील केर काढताना हा भुसा सगळ्या घरभर पसरतो(How To Make New Broom Dust Free).
घरातला कचरा कमी आणि झाडूतून पडणारा भुसाच जास्त असतो. त्यामुळे मग सुरुवातीचे काही दिवस नव्या झाडूने घर झाडताना अगदी वैताग येऊन जातो. असा त्रास होऊ नये म्हणून या तीन सोप्या टिप्स पाहूयात. या तीन अगदी साध्यासोप्या ट्रिक्सचा वापर केला तर नव्या झाडूतील भुसा निघून जाईल, जेणेकरून मग घर झाडताना त्या झाडूतून जास्त भुसा पडणार नाही(How to clean dust from new broom).
घरातला कचरा कमी आणि झाडूतून पडणारा भुसाच जास्त असतो. त्यामुळे मग सुरुवातीचे काही दिवस नव्या झाडूने घर झाडताना अगदी वैताग येऊन जातो. असा त्रास होऊ नये म्हणून या तीन सोप्या टिप्स पाहूयात. या तीन अगदी साध्यासोप्या ट्रिक्सचा वापर केला तर नव्या झाडूतील भुसा निघून जाईल, जेणेकरून मग घर झाडताना त्या झाडूतून जास्त भुसा पडणार नाही.
नविन आणलेल्या झाडूने घर झाडताना त्यातून खूप भुसा बाहेर पडतो. असं होऊ नये म्हणून तो झाडू वापरात काढण्यापुर्वी कशा पद्धतीने स्वच्छ करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यात सांगितलेला पहिला उपाय म्हणजे झाडू जेव्हा पॅक असतो तेव्हा तो थोडा आपटून घ्या. त्यामुळे त्याच्यातला भुसा बऱ्याच प्रमाणात गळून जाईल आणि झाडू बराचसा स्वच्छ होईल.
वरचा पहिला उपाय करून झाल्यानंतर आता हा दुसरा उपाय करा. यासाठी झाडू पॅकिंगमधून बाहेर काढा. जमिनीवर एक पेपर पसरवून ठेवा आणि त्यावर झाडू ठेवा. आता कपडे धुण्याचा जो ब्रश असतो तो झाडूवर घासा. वरून खाली अशा पद्धतीने एकाच दिशेने ब्रश घासा. ही क्रिया ३ ते ४ वेळा करा. यामुळे झाडूमध्ये राहिलेलं सगळं भुसकट, कचरा निघून जाईल आणि झाडू बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होईल.
दिवाळीत सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या माळांचा गुंता होऊ नये म्हणून ८ टिप्स, सजावट होईल छान!
तेल-तूप न वापरताही दिवे उजळतील तासंतास, ‘ही’ पाहा भन्नाट आयडिया- दिवाळीसाठी खास युक्ती...
तिसरा उपाय म्हणजे या नव्या झाडूवर खोबरेल तेलाचे काही थेंब शिंपडावे. यासाठी एका स्पंजवर खोबरेल तेल घेऊन ते झाडूवर सगळ्या बाजुंनी पसरवून लावावे. आणि झाडू थोड्यावेळासाठी तसाच ठेवून द्यावा. हा उपाय केल्याने देखील झाडू मधूला भुगा पटकन निघण्यास मदत होते.
एका मोठ्या बादलीत पाणी भरून घ्या. त्या पाण्यात झाडू तीन ते चार वेळा धुवून भिजत ठेवा. पाण्यामुळे झाडूतील भुसा निघून जाईल. व झाडू स्वच्छ होईल. ओला झालेला झाडू उन्हात वाळवत ठेवा. सुकल्यानंतर आपण झाडू वापरू शकता. या ट्रिकमुळे झाडूमधून भुसा निघून जाईल.