Join us  

फक्त अर्ध्या तासात करता येतं विकतपेक्षा जास्त सुगंधी, शुद्ध गुलाब पाणी- बघा सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2024 6:36 PM

How To Make Rose Water At Home: कोणतंही केमिकल न टाकता घरच्याघरी १०० टक्के शुद्ध असणारं गुलाबजल किंवा गुलाब पाणी करता येतं. बघा कसं करायचं....(recipe of making gulab jal at home)

ठळक मुद्देघरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने विकतच्यापेक्षा जास्त शुद्ध आणि जास्त सुगंधी गुलाबजल कसं करायचं ते पाहूया...

सौंदर्यशास्त्रात गुलाब पाण्याचे अतिशय महत्त्व आहे. कारण त्वचेसाठी, चेहऱ्यासाठी गुलाबपाणी अतिशय पोषक असते. घरच्याघरी आपण चेहऱ्यावर जे काही सौंदर्योपचार करतो, त्यापैकी बऱ्याचशा पद्धतींमध्ये गुलाब पाण्याचा वापर करायला सांगितलेला असतो. गुलाबपाणी नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरचे डाग, पिगमेंटेशन कमी होते. गुलाब पाण्याच्या थंडाव्यामुळे पिंपल्स येण्याचा त्रासही कमी होतो. बाजारात मिळणारं गुलाबजल शुद्ध असेलच असं नाही (How to make rose water at home in marathi). म्हणूनच घरच्याघरी (recipe of making gulab jal at home) अतिशय सोप्या पद्धतीने विकतच्यापेक्षा जास्त शुद्ध आणि जास्त सुगंधी गुलाबजल कसं करायचं ते पाहूया...(How to make 100 percent pure rose water?)

 

घरी गुलाबजल कसं तयार करायचं?

गुलाबजल तयार करण्यासाठी आपल्याला खूप काही सामानाची मुळीच गरज नाही. यासाठी आपल्याला फक्त ताजे, टवटवीत असे गावरान गुलाब लागणार आहे. गुलाब मात्र गावरानच असावेत, याची खात्री करून घ्या.

कोणतंच खत न टाकताही बाग नेहमीच राहील हिरवीगार- १ सोपा उपाय, फुलंही भरपूर येतील

आता गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करा. यासाठी मोठ्या आकाराची ६ ते ७ फुलं तरी पाहिजेत.

आता एक कढई किंवा पातेले घ्या. त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पसरवून टाका. मध्यभागी वाटी ठेवायला थोडी जागा रिकामी ठेवा.

आता मध्यभागी एक वाटी उपडी ठेवा आणि त्यावर एक वाटी सुलटी ठेवा. यानंतर गुलाबाच्या पाकळ्या भिजतील एवढं पाणी कढईमध्ये टाका आणि गॅस चालू करा.

 

कढईवर पक्कं झाकण ठेवून द्या. जेणेकरून कुठूनही आतली वाफ बाहेर येणार नाही.

केस पातळ आहेत पण हळदीकुंकू, लग्नसमारंभासाठी सुंदर अंबाडा घालायचाय? बघा ६ सुपरट्रेण्डी प्रकार

हे मिश्रण साधारण २० ते २५ मिनिटे उकळू द्या. मिश्रण उकळत असताना कढईवर ठेवलेल्या झाकणावर बर्फ ठेवा. बर्फाचे पाणी अधूनमधून काढून टाका. बर्फ वितळले की पुन्हा अजून बर्फ टाका. 

२० ते २५ मिनिटांनी गॅस बंद करा. यानंतर १० मिनिटे कढईवर झाकण तसेच राहू द्या. त्यानंतर झाकण काढा. आपण जी वाटी सुलटी ठेवलेली होती, त्यात जमा झालेलं पाणी म्हणजेच गुलाबपाणी होय. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलपाककृतीब्यूटी टिप्स