दिवाळी (Deepavali) असो किंवा इतर कोणताही सण (Diwali festival). दाराबाहेर रांगोळी (Rangoli) काढण्याची आपली परंपरा आहे. रांगोळी काढल्याने घर प्रसन्न वाटतं (Diwali Vibes 2024). सध्या रांगोळीचे अनेक छापा डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय ठिपके कमी, त्याजागी विविध डिझाईनच्या रांगोळी महिलावर्ग जमिनीवर काढतात. तर यात काही जण रांगोळी वापरून तर, काही जण फुलांचा वापर करून रांगोळी काढतात. पण आपण कधी पाण्याखालची रांगोळी काढली आहे का?
पाण्याखालची रांगोळी किंवा पाण्यावर तरंगणारी रांगोळी आपण पाहिलीच असेल. हे प्रकार जेव्हा आपण पाहतो. तेव्हा खरंतर आश्चर्य वाटतं. बुवा, पाण्याखाली रांगोळी नक्की काढायची कशी? पण खरंतर रांगोळीचा हा प्रकार अतिशय सोपा आहे. शिवाय झटपट आपण रांगोळी काढू शकता(How To Make Under Water Rangoli |Easy and simple Rangoli design).
दिवाळीची इतकी साफसफाई केली तरी घरात झुरळं दिसतातच? पाण्यात ३ गोष्टी घालून लादी पुसा
पाण्याखालची रांगोळी काढण्यासाठी टिप्स
- पाण्याखालची रांगोळी काढणं तशी सोपी पद्धत आहे. यासाठी विशेष म्हेनात घ्यावी लागत नाही. आपण ही रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता.
- यासाठी सर्वात आधी एक ताट घ्या. त्यावर चमचाभर तेल ओतून हाताने पसरवा. नंतर त्यावर एक छापा ठेवा. त्यावर आवडते रंग टाकून पसरवा आणि हलक्या हाताने पसरवा. आपण आपल्या आवडीनुसार छापा वापरू शकता.
- हलक्या हाताने रांगोळी पसरवल्यानंतर ताटाच्या कडेने पिवळा रंग पसरवा. आता ताट उलटे करून उरलेली रांगोळी बाहेर काढा. तेलामुळे रांगोळी ताटावर चिकटून राहील.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
- आता ताटामध्ये रांगोळी पूर्ण बुडेपर्यंत पाणी घाला. ताटाच्या भोवतीने फुलांच्या पाकळ्या पसरवा. आपण दिवेही ठेऊ शकता. ही रांगोळी ३-४ दिवस अरणात टिकते. अशा प्रकारे पाण्याखालची रांगोळी तयार.