Join us  

पांढरे कपडे धुतल्यानंतर होतील आणखी चमकदार, १ सोपी ट्रीक ; डाग जातील, कपडे दिसतील पांढरेशुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 2:30 PM

How To Make White Cloths Look New Again Easy Trick : पांढरे कपडे शुभ्र असतील तरच छान दिसतात.

ठळक मुद्देवेगवेगळ्या गोष्टींमध्ये कपडे भिजवल्याने मळ सुटून येण्यास मदत होतेड्रायक्लिनिंग महाग असल्याने घरच्या घरी कपडे स्वच्छ करण्याचा सोपा उपाय

पांढरे कपडे कोणावरही खुलून दिसतात. त्यामुळे नकळत आपली सगळ्यांमध्ये एक वेगळी छाप पडते. पण डाग पडतात म्हणून आपण असे कपडे घालणं टाळतो. पांढरे कपडे शुभ्र असतील तरच छान दिसतात. मात्र त्यावर डाग पडले किंवा ते थोडे कळकट झाले की त्याची मजा जाते. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं कपड्यांवर कसले ना कसले डाग पडतातच. कधी अन्नाचे तर कधी शाईचे, मातीचे नाहीतर आणखी कसले ना कसले डाग पडून कपडे खराब होतात (How To Make White Cloths Look New Again Easy Trick). 

असे कपडे थेट वॉशिंग मशीनला लावले तरी त्याचे डाग निघत नाहीत. अशावेळी हे पांढरे कपडे हातानेच घासावे लागतात. काही वेळा साध्या साबणानेही पांढऱ्या कपड्यांवरचे हे डाग निघत नाहीत. अशावेळी हे डाग काढण्यासाठी १ सोपी ट्रीक पाहूया. बाहेर ड्रायक्लिनिंगला १००-२०० रुपये घालण्यापेक्षा घरच्या घरीच हे कपडे नव्यासारखे दिसले तर? जेणेकरुन हे पांढरे कपडे डागाळले म्हणून कपाटात न ठेवता वापरता येतील आणि पुन्हा नव्यासारखे चमकदार दिसण्यास मदत होईल.  

(Image : Google)

१. पांढरे कपडे एका बादलीत किंवा टबमध्ये गरम पाण्यात भिजत घाला. 

२. यामध्ये पाव कप हायड्रोजन पॅरॉक्साईड घाला. यामुळे कपडे निर्जंतूक होतील आणि चमकदार दिसण्यास मदत होईल.

३. यात एक कप बेकींग सोडा घाला. ज्यामुळे कपड्यांना वास येत असेल तर तो जाईल आणि ते पांढरेशुभ्र दिसण्यास मदत होईल. 

४. कपड्यांना तेलाचे डाग असतील तर यामध्ये १ चमचा भांड्याचा लिक्विड साबण घाला. 

५. या मिश्रणात कपडे साधारण तासभर भिजवून ठेवा. 

६. त्यानंतर आपण नेहमी ब्रशने कपडे घासतो त्याप्रमाणे कपडे घासा.

७. कपडे नव्यासारखे पांढरेशुभ्र दिसतील. वरील घटकांमध्ये कपडे भिजवल्याने त्याचा मळ सुटण्यास मदत होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स