Join us  

हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 4:11 PM

How to Make Your Bed the Five Star Hotel Way : हॉटेलचे बेड किती व्यवस्थित असतात. त्यांच्या बेडशीट्स अगदी व्यवस्थित बसवलेल्या असतात, प्रत्येकाला आपला बेड व त्यावरची बेडशीट्स अशी व्यवस्थित राहावी असे वाटते, हॉटेलप्रमाणे बेड सेट करण्याच्या काही टिप्स लक्षात ठेवा.

घरातला बेड किंवा सोफा सुंदर दिसावा असं आपल्याला नेहमी वाटत असत. घरातील वस्तू जशाच्या तशा व्यवस्थित जागच्या जागी असल्या तर घराला शोभा येते तसेच घर सुंदर दिसण्यास मदत होते. त्यामुळे घरातील बेड व सोफ्यावरील बेडशीट्स या व्यवस्थित असाव्यात. आपण काहीवेळा घराच्या भिंतींच्या रंगाला साजेशा अशा विविध प्रकारच्या बेडशीट्स घेतो. या बेडशीट्स आपण दर आठवड्याला बदलतो, स्वच्छ धुतो त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. 

घरातील बेड आणि सोफ्यावर असलेली बेडशीट काही ठराविक काळानंतर विस्कटून जाते किंवा खराब होते. याउलट एखाद्या आलिशान हॉटेलच्या बेडवर पडल्यास किती निवांत वाटते. या हॉटेल्स व रेस्टोरंस्टच्या बेडशीट्स जागच्या अजिबात हलत नाहीत. हॉटेलमध्ये स्वच्छ चादरी, उशी, रजाई आणि ब्लँकेट हे सर्व व्यवस्थितपणे सेट केलेले असते. त्याचवेळी, आपल्या बेडवरची बेडशीट कितीही महाग आणि चांगली असली तरी ती अगदी काही काळाने लगेच खराब होते किंवा कितीही व्यवस्थित अंथरली तर विस्कळीत होऊन जाते. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न पडतो. मोठं मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समधील बेडवर जशा व्यवस्थित बेडशीट्स अंथरलेल्या असतात तशाच आपल्या घरच्या बेडवर असाव्यात असे आपल्याला वाटत असते. यासाठी काही महत्वाच्या टिप्सचा वापर करु(How to Make Your Bed Like a Luxury Hotel in just 5 minutes, 10 Bed Making Hacks!).

१. प्रथम बेडशीट इस्त्री करा :- बेडशीटस इस्त्री केल्यावरच कुरकुरीत वाटते. चादरी धुऊन वाळल्यानंतर त्या तशाच कपाटात ठेवण्याची चूक करु नका. त्यांना प्रथम इस्त्री करा. यामुळे त्यांच्यावरील सुरकुत्या दूर होतील आणि बेडशीट कुरकुरीत होईल. एवढेच नाही तर या सुरकुत्या दूर करण्यासाठी बाटलीमध्ये, थोडे व्हिनेगर आणि पाण्याचे द्रावण तयार करून त्याची धुतलेल्या बेडशीटवर फवारणी करा आणि नंतर इस्त्री करा. यामुळे बेडशीटचा वास आणि सुरकुत्याही दूर होतील.

पावसाळ्यात घरात सतत येणारा कुबट वास घालवण्यासाठी घरीच बनवा नैसर्गिक एअर फ्रेशनर...

२. गाद्याना कव्हर करा :- आपल्यापैकी काही लोक गाद्या खराब होऊ नये म्हणून त्यांना फिट असे कव्हर शिवून घेतात. परंतु असे न करता आपण या गाद्याना एका पातळ बेडशीटने कव्हर करून घ्यावे. सर्वप्रथम बेड किंवा सोफ्यावर फ्लॅट पातळ बेडशीट किंवा शीट लावल्यानंतर बेडशीट घातली जाते, त्यामुळे ती जागेवरून हलत नाही. 

पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...

३. १०० % टक्के कॉटन बेडशीट निवडा :- बेडशीट निवडताना ती योग्य कापडाची बेडशीट निवडणे तितकेच महत्वाचे असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये मूळ कॉटन बेडशीट्स वापरल्या जातात. सुती चादरी रेयॉन, सिल्क किंवा इतर कापडांप्रमाणे घसरत नाहीत. कॉटनच्या बेडशीट्स या प्रत्येक हंगामासाठी योग्य पर्याय देखील आहे. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

४. बेडशीट गादीखाली व्यवस्थित टक करा :- आपला घराचा बेड किंवा सोफा तयार करण्यासाठी, प्रथम गादीच्या वर एक सपाट, पातळ बेडशीट अंथरा. ती चारही बाजुंनी व्यवस्थित बेडखाली खोचून घ्या. त्यानंतर त्यावर बेडशीट अंथरा बेडशीटचा जादा भाग गाद्याच्या आत खोलवर दुमडा. शेवटी फ्लॅट शीट सोबत बेडशीट खेचून बेडच्या खाली दाबून खोचा. आता त्यानंतर  बेडवर उशा ठेवा. उशी पलंगावर ठेवण्यापूर्वी, प्रथम ती सपाट करा. प्रथम उशी कॉम्प्रेस आणि डीकॉम्प्रेस करा. उशीमध्ये कापसाचे गठ्ठे होऊ देऊ नका. 

याशिवाय आपल्या बेडशीटचा ताजेपणा टिकवण्यासाठी दर आठवड्याला बेडशीट्स धुवा. हॉटेलसारखा फील घ्यायचा असेल तर स्वच्छतेची काळजी घ्या. बॅक्टेरिया मारण्यासाठी बेडिंग आणि टॉवेल स्वच्छ करण्यासाठी सामान्यतः ते ६० अंश सेल्सियस इतक्या तापमानाच्या पाण्यांत धुण्याची गरज असते. परंतु आपल्याला सौम्य डिटर्जंटची देखील आवश्यकता असते, कारण केवळ तापमान जीवाणू नष्ट करत नाही.

टॅग्स :सोशल व्हायरल