Join us  

फरशी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन कुबट वास येतो ? ३ सोप्या टिप्स, मॉप होईल नव्यासारखा पांढराशुभ्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 12:06 PM

How To Clean A Dirty Mop Head : फरशी पुसण्याच्या मॉपचे अस्वच्छ कापड स्वच्छ करण्यासाठी खास सोपे उपाय...

घरातील फरशी स्वच्छ ठेवायची म्हणजे किमान दिवसांतून २ वेळा तरी पुसावी लागतेच. ही फरशी स्वच्छ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो. पूर्वी फरशी स्वच्छ करण्यासाठी आपण पायपुसणी किंवा घरातील एखादे जुने झालेले कापड वापरत असू. परंतु जसा काळ बदलत गेला तशी फरशी स्वच्छ करण्याची उपकरणेही बदलत गेली. पूर्वीच्या या जुन्या पायपुसण्याची जागा आज मॉप, व्हॅकहयुम क्लिनर यांसारख्या उपकरणांनी घेतली आहे(How do I make my mop white again?).

आज प्रत्येक घरात लादी पुसण्याचा हा कापडी मॉप असतोच. या कापडी मॉपने फरशी स्वच्छ करणे अतिशय सोपे व सोयीचे ठरते. त्याचबरोबर या मॉपचा वापर करुन कुणीही अतिशय झटपट फरशी पुसून स्वच्छ करु शकतो. कापडी मॉपचा हा पर्याय अतिशय सोपा असला तरीही त्याची स्वच्छता ठेवणे हा मोठा टास्कच (How do you clean a black mop?) असतो. कापडी मॉपने वारंवार फरशी पुसून तो कालांतराने धूळ, माती, घाण चिटकून काळा (How to Clean the Mop) होतो. याचबरोबर हा कापडाचा मॉप अतिशय जाड असल्याने तो व्यवस्थित धुवून, सुकवून ठेवला पाहिजे. वेळीच त्याची योग्य ती स्वच्छता केली नाही तर तो पांढराशुभ्र मॉप काळा अस्वच्छ (How do you get stains out of a mop?) दिसू लागतो. जर हा मॉप व्यवस्थित (How To Clean a Mop When You're Finished) न वाळता तसाच ओला ठेवला तर त्यातून कुबट वास येतो, आणि त्यावर बुरशी चढून तो खराब होतो. मॉपचे कापड स्वच्छ करण्याकडे आपण काहीवेळा फारसे लक्ष देत नाही, परंतु याची स्वच्छता ठेवण्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात(How to make your mop white again, deep clean a mop with vinegar, how to clean a sticky mop).

मॉपच्या खालचे कापड नेमके कधी बदलावे ?

मॉपच्या खालचे कापड हे सतत फरशी पुसून खराब झालेले असते. असे कापड आपण कितीही धुतले तरीही ते खराब होतेच. असे असले तरीही ते कापड प्रत्येक वापरानंतर साबणाच्या पाण्याने धुवून स्वच्छ करुन उन्हात वाळवून घ्यावे. यासोबतच हे खराब झालेले मॉपचे कापड एका ठराविक काळानंतर बदलणे आवश्यक असते. दर २ ते ३ महिन्यांतून एकदा हे मॉपच्या खालचे कापड बदलणे आवश्यक आहे. 

रोजच्या वापरातला चपातीचा तवा झाला खराब ? १ सोपी ट्रिक, तवा होईल पुन्हा नव्यासारखा चकाचक...

डबे - बरण्यांचा लोणची - मसाल्यांचा वास जात नाही ? १ सोपी ट्रिक - वास जाईल पटकन...

एकदा वापरून झाल्यानंतर हा मॉप कसा ठेवावा ? 

दिवसभरात बरेचदा मॉपचा वापर करून झाल्यावर मॉप पाणी व डिटर्जंटच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावा. धुतल्यानंतर तो व्यवस्थित वाळेल अशा ठिकाणी ठेवून द्यावा. शक्यतो हा मॉप वाळण्यासाठी ओलाव्यापासून लांब ठेवावा. जिथे उजेड किंवा व्यवस्थित सूर्यप्रकाश येत असेल अशा जागी मॉप वाळत ठेवावा. मॉप   वाळण्यासाठी ठेवताना तो सगळ्या बाजुंनी व्यवस्थित वाळेल याची खात्री करून घ्यावी. यासाठी हा मॉप एखाद्या हुकला टांगून ठेवावा जेणेकरून तो व्यवस्थित चारही बाजुंनी वाळेल. हा मॉप धुतल्यानंतर जमिनीपासून दूर कोरड्या जागी ठेवावा. कपड्यात ओलावा राहणार नाही याची खात्री करुन घ्यावी. 

मिक्सरचे झाकण लूज झाल्याने वाटण बाहेर उडते ? १ झटपट ट्रिक, झाकण बसेल फिट...

वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये साचला काळा घाण थर ? ३ सोप्या ट्रिक्स, ड्रायर करा चुटकीसरशी स्वच्छ...

घाण झालेला मॉप स्वच्छ कसा करावा ? 

१. व्हिनेगर :- घाण झालेला मॉप स्वच्छ करण्यासाठी आपण साबण, डिटर्जंट सोबतच व्हिनेगरचा देखील वापर करु शकतो. एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यात ३ ते ४ टेबलस्पून व्हिनेगर घालून त्यात हा खराब झालेला मॉप अर्धा ते पाऊण तास तसाच बुडवून ठेवा. त्यानंतर हा मॉप जोपर्यंत त्यातील कचरा संपूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यावा.   

२. ब्लिचचा वापर कसा करावा :- मॉपमधील वाईट बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी आपण ब्लिचचा वापर करु शकता. मॉप क्लॉथमध्ये असलेले धोकादायक बॅक्टेरिया ब्लिचने सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात. अशावेळी बादलीत समप्रमाणात पाणी आणि ब्लिच मिसळा. नंतर मॉप या सोल्युशनमध्ये १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर हा मॉप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून स्वच्छ करावा.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स