Lokmat Sakhi >Social Viral > कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया

कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया

How To Make Your Own Water Diya At Home : अनेकदा तेल आणि तूप दिव्यांखाली गळते, फरशी चिकट होते, अशा वेळी आपण तेलाऐवजी पाण्याचा वापर करू शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 12:03 PM2023-11-13T12:03:31+5:302023-11-13T12:04:19+5:30

How To Make Your Own Water Diya At Home : अनेकदा तेल आणि तूप दिव्यांखाली गळते, फरशी चिकट होते, अशा वेळी आपण तेलाऐवजी पाण्याचा वापर करू शकता

How To Make Your Own Water Diya At Home | कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया

कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया

दिवाळी (Diwali 2023) म्हणजे रोषणाईचा सण. या सणानिमित्त प्रत्येक घरात दिवे लावण्यात येते. सध्या सर्वत्र दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. रोषणाई, फटाके, दिवे, मिठाई, फराळ या सगळ्या गोष्टींमुळे घरात आनंदमय वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येक घरात किंवा दारात पणत्या (Water Diyas) लावण्यात येतात. जसा काळ बदलत चालला आहे, पारंपारिक दिव्यांच्या जागी फॅन्सी दिव्यांनी जागा घेतली आहे. पण दिवे आजही तेल, तुपावरच जळतात.

पण सध्या तेल आणि तुपाचे भाव गगनाला भिडलेत. पण तेल आणि तुपाशिवाय पणती जळू शकेल का? पाण्यावर जळणारे दिवे आपण कधी पाहिलं आहे का? जर आपल्याला तेल आणि तुपाची बचत करायची असेल तर, पाण्याचा हा सोपा उपाय करून पाहा. या ट्रिकमुळे पणतीत जास्त तेल किंवा तुपाची गरज भासणार नाही(How To Make Your Own Water Diya At Home).

पाण्यावर जळणारे दिवे

सर्वप्रथम, कापसाची वात तयार करा. एका वाटीत तेल घ्या, त्यात तयार वात काही वेळासाठी बुडवून ठेवा. त्यानंतर वात पणत्यांमध्ये ठेवा.

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

आता घाला पाणी

वाती पेटल्यानंतर त्यात पाणी घाला. नंतर पाण्यावर ५ ते ६ तेलाचे थेंब घालून मिक्स करा. नंतर जिथे आपल्याला दिवे ठेवायचे आहे, त्याठिकाणी दिवे लावून ठेवा.

कमी तेलात दिवे कसे लावायचे?

जर दिव्यांनी कमी तेल शोषावे असे वाटत असेल तर, दिवे आधी ७ ते ८ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. नंतर सुकवून दिव्यात तेल आणि वात लावून पेटवा. असे केल्याने दिवे जास्त तेल शोषून घेणार नाही.

शरीरात वाढेल उर्जा, मसल्स होतील स्ट्राँग, फक्त रोज एक प्रोटीन बार खा, पाहा प्रोटीन बार करण्याची सोपी कृती

सध्या बाजारात वॉटर सेंसर एलईडी दिवे मिळतात. जे दिसायला फार आकर्षक - सुंदर दिसतात. हे दिवे बाजारात सहज उपलब्ध आहेत. जर आपल्याला फॅन्सी दिवे हवे असतील तर आपण हे दिवे खरेदी करू शकता.

Web Title: How To Make Your Own Water Diya At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.